Team India Jersey : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय; बदलली टीम इंडियाची जर्सी!

Team India Jersey : भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआयने ( BCCI ) एक मोठा बदल केला आहे. यावेळी टीम इंडियाच्या ( Team India ) जर्सीमध्ये बदल करण्यात आला आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 10, 2023, 10:35 AM IST
Team India Jersey : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय; बदलली टीम इंडियाची जर्सी! title=

Team India Jersey : रविवारी दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अशातच या सामन्यापूर्वी बीसीसीआयने ( BCCI ) एक मोठा बदल केला आहे. यावेळी टीम इंडियाच्या ( Team India ) जर्सीमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या जर्सीचे फोटो व्हायरल होत असून काही खेळाडूंनी ही जर्सी परिधान केली आहे. 

टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठा बदल

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रविवारी सामना होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाच्या जर्सीबाबत मोठी माहिती समोर आलीये. भारताच्या जर्सीत मोठा बदल झाल्याचं दिसून येतंय. मुख्य म्हणजे हा बदल आशिया कपच्या जर्सीमध्ये नसून आशियाई क्रीडा ( Asian Games 2023 ) म्हणजेच एशियन गेम्ससाठीचा आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी चीनला जाणार्‍या टीमच्या जर्सीमध्ये करण्यात आला आहे. 

एशियन गेम्समध्ये ( Asian Games 2023 ) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया नियमितपणे परिधान करत असलेली जर्सी घालणार नाही. तर यासाठी नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. चाहत्यांना ही जर्सी फारच आवडलीये. 

चीन करणार एशियन गेम्सचं आयोजन

चीनमध्ये होणाऱ्या आगामी 19व्या एशियाई क्रीडा स्पर्धेत ( Asian Games 2023 ) भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही टीम क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चांगल्या रँकिंगमुळे दोन्ही संघ त्यांच्या स्पर्धांच्या थेट उपांत्यपूर्व फेरीत भिडणार आहेत. 19व्या आशियाई क्रीडा ( Asian Games 2023 ) स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 7 ऑक्टोबरला रंगणार आहे.

कशी आहे एशियन गेम्ससाठी टीम इंडिया

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग.