Reserve Day Rules, Asia Cup 2023 : आज भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून या सामन्यातंही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामुळे चाहते देखील चिंतेत आहेत. 10 तारखेला होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट पाहता आशियाई क्रिकेट काऊंसिलने ( Asian Cricket Cousil ) मोठा निर्णय घेत भारत - पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येईल. मात्र जर 11 तारखेला देखील हा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर कोणती टीम पुढे जाणार?
भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) आज दुपारी 3 वाजता क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. प्रत्येक देशातील क्रिकेट प्रेमी या सामन्यासाठी उत्सुक आहेत. एशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहतायत कारण दोन्ही टीममधील शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.
आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील या सुपर-4 फेरीच्या सामन्यासाठी रिझर्व डे ठेवला आहे. जर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला तर हा सामना 11 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. 10 तारखेला जिथपर्यंत सामना थांबवण्यात आला असेल तिथून पुढे 11 तारखेला हा सामना सुरु केला जाईल.
हा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांच्या मनात नक्कीच आला असेल की 11 सप्टेंबरला म्हणजेच रिझर्व्ह डेलाही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर पुढे काय होणार? याचं उत्तम आम्ही तुम्हाला देणार आहोत. जर हा सामना रिझर्व्ह डे लाही पूर्ण झाला नाही तर दोन्ही टीमना गुण वाटून दिले जाणार आहेत. अशा स्थितीत दोघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळणार आहे.
सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी प्रत्येकी 2 गुण आहेत. दोन्ही टीमने एक-एक विजय मिळवला आहे. दरम्यान यामध्ये चांगल्या नेट रनरेटमुळे पाकिस्तान अव्वल स्थानावर आहे. जर रिझर्व्ह डे लाही सामना न होता भारत-पाकिस्तानला 1-1 पॉईंट दिला तर पाकिस्तानकडे 3, भारत 1 आणि श्रीलंका 2 असे पॉईंट्स होती. अशा स्थितीत फायनल गाठण्यासाठी पुढचे सामना भारतासाठी महत्त्वाचे ठरणार दोन्ही सामने जिंकावे लागतील. टीम इंडियाला 12 सप्टेंबरला श्रीलंका आणि 15 सप्टेंबरला बांगलादेशशी सामना करायचा आहे. अशातच फायनलचं चित्र स्पष्ट होण्यासाठी तिन्ही टीम्सना पुढच्या सामन्यांवर अवलंबून रहावं लागेल.