हॅट्रिकआधी कुलदीपने धोनीला विचारला होता हा प्रश्न

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या कुलदीप यादवने हॅट्रिक करत नवा इतिहास रचला. वनडेत हॅट्रिक करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरलाय. 

Updated: Sep 22, 2017, 09:42 AM IST
हॅट्रिकआधी कुलदीपने धोनीला विचारला होता हा प्रश्न title=

कोलकाता : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या कुलदीप यादवने हॅट्रिक करत नवा इतिहास रचला. वनडेत हॅट्रिक करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरलाय. 

कुलदीपने दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर मॅथ्यू वेड, अॅश्टन अगर आणि पॅट कमिन्स यांना बाद केले.

सामना संपल्यानंतर हॅट्रिकबद्दल बोलताना कुलदीप म्हणाला, 'मी कधीच असे स्वप्न पाहिले नव्हते. सुरुवातीला मी संघर्ष करत होतो. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे कधीही काहीही होऊ शकते. गेल्या सामन्यात माझ्या चेंडूवर तीन षटकार ठोकण्यात आले होते. त्यातून मी खूप काही शिकलो. यावेळी बॉलिंग करण्याआधी मी धोनीला कशी गोलंदाजी करु हे विचारले, तेव्हा धोनीने मला तुला जशी बॉलिंग करावीशी वाटते तशी कर असा सल्ला दिला'. 

कुलदीपच्या हॅट्रिकनंतर त्याच्या घरात तर दिवाळीच साजरी करण्यात आली. यावेळी मिठाई वाटून कुटुंबीयांनी आनंद साजरा केला.