B'day Special : गावस्कर यांच्याअगोदर 'या' व्यक्तीच्या नावे फलंदाजीचे सर्व रेकॉर्ड

क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सुरूवातीचा काळ भरपूर संघर्षाचा होता. संघाने ज्या खेळाडूंच्या उत्तम खेळामुळे विजयाचा आस्वाद घेतला त्यामध्ये प्रमुख नाव होत पॉली उमरीगर. पॉली हे भारतातील सर्वात उत्तम फलंदाजांपैकी एक आहे. ज्यांनी पहिल्यांदा दुहेरी शतक लगावून भारताला एक वेगळा क्लास मिळवून दिला. 

Dakshata Thasale Updated: Mar 28, 2018, 08:53 AM IST
B'day Special : गावस्कर यांच्याअगोदर 'या' व्यक्तीच्या नावे फलंदाजीचे सर्व रेकॉर्ड  title=

मुंबई : क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सुरूवातीचा काळ भरपूर संघर्षाचा होता. संघाने ज्या खेळाडूंच्या उत्तम खेळामुळे विजयाचा आस्वाद घेतला त्यामध्ये प्रमुख नाव होत पॉली उमरीगर. पॉली हे भारतातील सर्वात उत्तम फलंदाजांपैकी एक आहे. ज्यांनी पहिल्यांदा दुहेरी शतक लगावून भारताला एक वेगळा क्लास मिळवून दिला. 

भारताच्या क्रिकेट इतिहासात महान फलंदाजीची सुरूवात पॉली उमरीगरपासून सुरू झाली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून एक वेळ अशी होती की, गावस्कर यांनी अनेक पॉली उमरीगरचे रेकॉर्ड तोडले होते. 

28 मार्च 1926 मध्ये जन्मलेला रतनजी उमरीगर 1948 ते 1962 पर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. पॉली उमरीगर हे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. 2006 मध्ये 7 नोव्हेंबरमध्ये त्यांच निधन झालं. आपल्या करिअरमध्ये त्यांनी देशासाठी भरपूर रेकॉर्ड केले. 

एकेकाळी सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी आपल्या बॅटच्या सहाय्याने जे रेकॉर्ड केले. त्याची सुरूवात खरीतर पॉली उमरीगर यांनी केली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये दुहेरी शतक करणारा हा पहिला खेळाडू होता. 1955 मध्ये 233 धावा करून शानदार खेळ न्यूझीलँडच्या विरूद्ध पहिलं दुहेरी शतक केलं होतं. 

चेंडू छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे ३ खेळाडू दोषी

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे ३ खेळाडू माघारी परतणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ही माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट हे तीन खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. बॉलशी छेडछाड करण्यामध्ये या तिघांचाच समावेश होता. अन्य कोणताही खेळाडू किंवा प्रशिक्षकाला याबाबत कल्पना नव्हती, असं सदरलँड यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन त्याच्या पदावर कायम राहणार आहे.