BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अशी केली ICC ची कोंडी

या क्रिकेटींग ब्रेनमुळे दादाने प्रशासक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) समोर एक विचित्र गोंधळ निर्माण केला आहे. 

Updated: May 29, 2021, 09:51 PM IST
BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अशी केली ICC ची कोंडी title=

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे अध्यक्ष टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दादांच्या नावाने प्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू सौरव गांगुली आहे. सर्वांना ठाऊक आहे की गांगुलीचा क्रिकेट ब्रेन हा किती शार्प आहे. या गेममध्ये कोणीही त्यांच्याकडून जिंकू शकत नाही. या क्रिकेटींग ब्रेनमुळे दादाने प्रशासक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) समोर एक विचित्र गोंधळ निर्माण केला आहे. आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआयने असा एक हुकुमाचा एक्का टाकला आहे. ज्यामुळे आयसीसीला देखील तो स्वीकारावा लागेल.

बीसीसीआयने घोषित केले की, कोरोनामुळे आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामने युएईमध्ये खेळले जातील. आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे खेळले जातील. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 25 दिवसांच्या कालावधीत होतील. त्यानंतर भारतातच टी -20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कोरोनामुळे आयपीएलचा खेळ बिघडत होता. पण बीसीसीआयने त्यावर तोडगा काढला.

भारतात दररोज दीड लाखाहून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात टी-20 विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धा आयोजित करणे शक्य नव्हते. आयसीसीचे मत होते की, ही स्पर्धा भारताऐवजी युएईमध्ये खेळली जावी, परंतु बीसीसीआयने आयसीसीच्या सर्व योजनांना सुरुंग लावला. आयपीएलचे 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन मैदानावर खेळले जातील.

जर तीन मैदानावर 31 सामने खेळले गेले तर युएईमध्ये टी-20 विश्वचषक 2021 चे आयोजन करणे शक्य होणार नाही, कारण या मेगा स्पर्धेत 45 सामने खेळले जातील. आयपीएलच्या 31 सामने जूनमध्ये आणि पीएसएलचे 20 सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत, युएईच्या तीन मैदानांवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 45 सामन्यांसाठी खेळपट्टी आणि मैदान तयार करणे सोपे काम ठरणार नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक भारतातच होऊ शकतो.

हाच निर्णय बीसीसीआयच्या एसजीएममध्ये घेण्यात आला आहे. 1 जूनला होणाऱ्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मिळून टी-20 वर्ल्ड कपसाठी काही वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीस टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय आयसीसीने घ्यावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे, कारण सध्या भारतात कोरोनाची अनेक प्रकरणे आहेत. जर बीसीसीआयला वेळ मिळाला तर टी20 वर्ल्डकप भारतातच खेळवला येईल.