खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआयकडून या खेळाडूंची शिफारस

खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे.

Updated: May 30, 2020, 09:54 PM IST
खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआयकडून या खेळाडूंची शिफारस title=

मुंबई : खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे. खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने रोहित शर्माचं नाव दिलं आहे, तर अर्जुन पुरस्कारासाठी ईशांत शर्मा, शिखर धवन आणि दीप्ती शर्मा यांची नावं देण्यात आली आहेत.

टीम इंडियाचा उपकर्णधार असलेला रोहित शर्मा गेल्या काही कालावधीपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयसीसीनेही २०१९ सालासाठी रोहितला सर्वोत्तम वनडे बॅट्समनचा पुरस्कार दिला होता. २०१९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने ५ शतकं ठोकून विश्वविक्रम केला होता. टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकं करणारा रोहित हा जगातला एकमेव खेळाडू आहहे. 

तर वनडेमधला रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर शिखर धवनचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी देण्यात आलं आहे. शिखर धवन हा वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २ हजार आणि ३ हजार रन करणारा भारतीय खेळाडू आहे. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ४ हजार आणि ५ हजार रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

ईशांत शर्मा हा आशिया खंडाबाहेर सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय फास्ट बॉलर आहे. तर ऑलराऊंडर दीप्ती शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोअर करणारी भारतीय महिला आहे.