Ind vs SA T20I Series | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा

India vs South Africa T20I Series,  Dinesh Karthik | बीसीसीआयने (Bcci) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.

Updated: May 22, 2022, 06:27 PM IST
Ind vs SA T20I Series | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा title=

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Team India vs South Africa) यांच्यात  5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. या सीरिजसाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित एकमेव कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने आयपीएलमध्ये  धमाकेदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच दिनेश कार्तिकचे (Dinesh Karthik) संघात तब्बल 3 वर्षानंतर पुनरागमन झालं आहे. (bcci announced team india for t20i series against south africa and test squad for 5h rescheduled test against england dinesh karthik comback in team)

केएलकडे नेतृत्व, युवांना संधी

या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे उमरान मलिक, दीपक हुड्डा, व्यंकटेश अय्यर, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक या आयपीएलचा 15 वा मोसम गाजववेल्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच केएल राहुलकडे या मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे.

कार्तिकचं तब्बल 3 वर्षांनी संघात कमबॅक

दिनेश कार्तिकला या धमाकेदार कामिगिरीनंतर टीम इंडियात संधी द्यावी, अशी क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार मागणी करण्यात आली होती. अखेर बीसीसीआयने कार्तिकला संधी दिली आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

      मॅच                         तारीख                  ठिकाण

पहिला सामना                  9 जून                  दिल्ली
दुसरा सामना                 12 जून                  कटक
तिसरी मॅच                    14 जून                  वायझॅग
चौथा सामना                  17 जून                 राजकोट
पाचवी मॅच                    19 जून                 बंगळुरु

टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम 

टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.

टीम इंडिया

केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक. 

इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित पाचव्या टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसीध कृष्णा.