World Cup पूर्वी टीम इंडियाचं शेड्यूल जारी; BCCI ची मोठी घोषणा!

IND VS WI Full Schedule: बीसीसीआयने भारताच्या (Team India) वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. 

Updated: Jun 13, 2023, 07:59 AM IST
World Cup पूर्वी टीम इंडियाचं शेड्यूल जारी; BCCI ची मोठी घोषणा! title=
IND V WI, BCCI announce schedule

India Tour On West Indies : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC Final 2023) झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या (India's Tour of West Indies) दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने (BCCI) भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. खास गोष्ट म्हणजे दोन्ही संघातील हे सामने ना भारतात होणार आहेत, ना वेस्ट इंडिजमध्ये... त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वेस्टइंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केलं असून या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही मालिका खेळणार आहे. येत्या 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात  2 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामन्याची मालिका आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

कुठे खेळले जाणार सामने?

बीसीसीआयने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, 2 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामन्याची मालिका आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका ही अमेरिकेत खेळवली जाणार आहे. 12 ते 24 जुलै दरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यातील पहिला सामना विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियमवर, तर दुसरा कसोटी सामना क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर होईल. तसेच वनडे आणि टी-ट्वेंटीचं शेड्यूल देखील समोर आलंय.

27 आणि 29 जुलै, 1 ऑगस्ट या तीन दिवशी तीन वनडे सामने खेळवले जातील.  वनडे मालिकेतील सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. त्यामुळे सामने अधिक रोमांचक होतील, याच शंका नाही. 3 ते 13 ऑगस्टदरम्यान 5 टी-20 सामन्यांची मालिका होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सुरु होतील. 

पाहा संपूर्ण शेड्यूल

कसोटी सामने

12 - 16 जुलै - पहिला  सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका

20 - 24 जुलै - दुसरा  सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद

आणखी वाचा - Gautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं!

वनडे मालिका

27 जुलै - पहिला  सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

29 जुलै - दुसरा  सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

1 ऑगस्ट - तिसरा  सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

टी-ट्वेंटी मालिका

3 ऑगस्ट - पहिला सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

6 ऑगस्ट - दुसरा सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

8 ऑगस्ट - तिसरा सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

12 ऑगस्ट - चौथा सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

13 ऑगस्ट - पाचवा सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

दरम्यान, आगामी वनडे वर्ल्ड पाहता वेस्ट इंडिजसोबतची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. शुभमन गिलला पुन्हा संधी दिली जाईल का? तसेच साई सुदर्शन आणि यशस्वी जयस्वाल यांना टीम इंडियात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये बुमराह कमबॅक करणार की नाही किंवा कोणत्या युवा गोलंदाजांना संधी मिळणार? हे देखील पहावं लागणार आहे.