IND vs SL : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्याचं शेड्यूल जाहीर करताच कॅप्टनचा तडकाफडकी राजीनामा, म्हणाला...

India vs Sri Lanka series Schedule : बीसीसीआयने आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सिरीजचं वेळापत्रक जाहीर केलं. अशातच आता श्रीलंकेचा कॅप्टन वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga resigns as T20 captain) याने राजीनामा दिला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jul 11, 2024, 07:43 PM IST
IND vs SL : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्याचं शेड्यूल जाहीर करताच कॅप्टनचा तडकाफडकी राजीनामा, म्हणाला... title=
BCCI Annouced India vs Sri Lanka series Schedule

Wanindu Hasaranga resigns as T20 captain : टीम इंडियाचे नवे छावे सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, जिथं टीम इंडिया 5 सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळत आहे. यानंतर भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर जायचं आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर केलंय. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. एकीकडे बीसीसीआयने वेळापत्रक (India vs Sri Lanka series Schedule) जाहीर केलं तर दुसरीकडे श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय. श्रीलंकेचा कॅप्टन वानिंदू हसरंगा याने टी-ट्वेंटी फॉरमॅटच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला आहे.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील श्रीलंकेच्या खराब कामगिरीमुळे वानिंदू हसरंगा याने कॅप्टन्सीचा राजीनामा दिलाय. हसरंगा याने एसएलसीला दिलेल्या राजीनामा पत्रात आपली भूमिका जाहीर केली. एक खेळाडू म्हणून श्रीलंकेसाठी नेहमीच माझे सर्वोत्कृष्ट प्रयत्न असतील आणि मी नेहमीप्रमाणेच माझ्या संघाला आणि नेतृत्वाला पाठिंबा देईन, असं हसरंगा यावेळी म्हणाला आहे. हसरंगाने श्रीलंकेसाठी 10 सामन्यात नेतृत्व केलं होतं.

भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे आता श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया कोणाच्या नेतृत्वाखाली खेळेल? असा सवाल विचारला जातोय. एकीकडे टीम इंडियासाठी गुड न्यूज म्हणजे, बीसीसीआयने गौतम गंभीरची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता टीम इंडिया वेगळ्याच स्वॅगमध्ये दिसेल.

टीम इंडियाचं वेळापत्रक

26 जुलै – पहिला टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
27 जुलै – दुसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
29 जुलै – तिसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
1 ऑगस्ट – पहिली वनडे, कोलंबो
4 ऑगस्ट – दुसरी वनडे, कोलंबो
7 ऑगस्ट – तिसरी वनडे, कोलंबो