भारत-इंग्लंड टेस्ट सामन्याआधी बीसीसीआयची क्रिकेट चाहत्यांना मोठी खूशखबर

क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर...

Updated: Feb 1, 2021, 07:43 PM IST
भारत-इंग्लंड टेस्ट सामन्याआधी बीसीसीआयची क्रिकेट चाहत्यांना मोठी खूशखबर title=

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चांगली बातमी दिली आहे. चेन्नईमध्ये होणारा हा सामना पाहण्याकरिता 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये हा सामना पाहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तिकिटांच्या विक्रीबाबत लवकरच माहिती देण्यात येईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या कसोटी मालिकेची आतुरतेने प्रतिक्षा आहे. या मालिकेतील दोन्ही संघांमधील टक्कर पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट दिग्गज आणि क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. सोमवारी, बीसीसीआयने चेन्नईत होणार्‍या दुसर्‍या सामन्यासाठी प्रेक्षकांना ग्रीन सिग्नल दिले.

दोन्ही देशांमधील पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांचे आयोजन करण्याची जबाबदारी चेन्नईवर देण्यात आली आहे. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करीत आहेत. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिन आर.एस. रामास्वामी यांनी दुसर्‍या कसोटीत 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थित राहण्याची व्यवस्था केली जाईल. अशी माहिती दिली आहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी - 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी (चेन्नई)

दुसरी कसोटी - 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी (चेन्नई)

तिसरी कसोटी - 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी (अहमदाबाद)

चौथी कसोटी - 4 मार्च ते 7 मार्च (अहमदाबाद)

नुकत्याच ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऐतिहासिक 2-1 असा विजय मिळवला आहे. दुसरीकडे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने कसोटी मालिका जिंकली आहे. दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. या कारणास्तव, ही मालिका रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.