दुबई : T20 वर्ल्डकप 2021च्या चौथ्या सामन्यात, भारताने स्कॉटलंडवर 8 विकेट्स राखून विजय नोंदवला. दुबईत शुक्रवारी झालेल्या सामन्यात स्कॉटलंडचा संघ अवघ्या 85 रन्समध्ये गारद झाला. भारताने केवळ 39 चेंडूमध्ये हे छोटं लक्ष्य गाठलं. सलग दोन विजय मिळवल्यानंतर सेमीफायनल गाठण्याच्या भारताच्या आशा कायम राहिल्या आहेत.
स्कॉटलंडविरूद्ध सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने मोठं विधान केलं आहे. विराट कोहली म्हणाला की, सराव सामन्यांमध्येही टीम इंडिया अशीच फलंदाजी करत होती.
सामना संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला, "टीमने चांगली कामगिरी केली. आता 7 नोव्हेंबरला काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सामन्यात
झालेल्या कामगिरीबद्दल मला जास्त बोलायचं नाही. आम्ही काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. शिवाय, या ठिकाणी टॉस भूमिका महत्त्वाची ठरली. आम्हाला त्यांना 110-120 रन्सपर्यंत थांबवण्याची मानसिकता होती."
विराट कोहली म्हणाला, "जर तुम्ही आमच्या सराव सामन्यांकडे पाहिलं तर आम्ही खरोखरच चांगली फलंदाजी करत होतो. त्याच प्रकारे क्रिकेटच्या दोन ओव्हर्स आणि मोमेंटम पूर्णपणे वेगळा असू शकतो. विरोधी संघांनीही चांगली गोलंदाजी करून आमच्यावर दडपण आणलं तिथेच काहीतरी चूक झाली. शमी, जडेजा प्रत्येकजण आपापल्या लयीत आहे याचा मला आनंद आहे."