Lakshya Sen vs Jonathan Christie : पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणारा भारताचा वंडर बॉय म्हणजे लक्ष्य सेन याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीची चमक दाखवली. लक्ष्य सेनने जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा सगळ सेटमध्ये पराभव केला. 23 वर्षांच्या लक्ष्यने 50 मिनिटात खेळ खल्लास केला. लक्ष्य सेनने 21-18, 21-12 अशा सलग दोन सेटमध्ये जोनाथन क्रिस्टीचा पराभव केला अन् सुवर्णपदकाच्या दिशेने आगेकुच केली. अशातच आता लक्ष्य सेनच्या एका शॉटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लक्ष्य सेन पहिल्या सेटमध्ये खूप मागे होता आणि एका क्षणी तो सामना गमावेल असं वाटत होतं, पण त्याने जोरदार पुनरागमन केलं. लक्ष्यची एनर्जी पाहून क्रिस्टीला देखील घाम फुटला. त्याच्या प्रत्येक शॉटमध्ये आत्मविश्वास दिसत होता. सामना रोमांचक स्थितीत असताना लक्ष्य सेनने अविश्वसनीय चपळता दाखवली आणि गुण कमावले. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये लक्ष्यने पुनरागमन केलं आणि 19-18 ने आघाडी घेतली. त्याला आणखी दोन गुण पाहिजे असताना लक्ष्यने उलटा हात फिरवून शॉट मारला.
लक्ष्य सेनचा हा शॉट पाहून डोनेशियाचा जोनाथन क्रिस्टीचा देखील आवाक झाला अन् त्याचा कॉन्फिडेन्स देखील ढासळला. लक्ष्यने याचाच फायदा घेतला अन् दुसऱ्या सेटमध्ये देखील बाजी मारली. लक्ष्यचा हा शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या शॉटला नक्की काय नाव द्यावं? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. अनेकांनी यावर भन्नाट कमेंट केल्या अन् वेगवेगळी नावं सुचवली आहेत.
This is where Lakshya Sen broke Jonatan Christie Mentally. pic.twitter.com/zjeaLOKnFW
— R A T N I S H (@LoyalSachinFan) July 31, 2024
दोन्ही खेळाडूंसाठी ही करा किंवा मरो अशी स्पर्धा होती. लक्ष्यने क्रिस्टीचा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकमधील आपला प्रवास संपवला. तर प्री-क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्यचा सामना भारताच्याच एचएस प्रणॉयशी होऊ शकतो. त्यामुळे आता भारताचं एक पदक निश्चित होण्याची शक्यता आहे.
लक्ष्य सेनने गट फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यात केविन कॉर्डनचा पराभव केला होता. मात्र, लक्ष्य सेनचा सामना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने हटवला. त्यामुळे लक्ष्यला मोठा धक्का बसला होता. केविन कॉर्डन हा डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असं बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून सांगण्यात आलं होतं.