VIDEO: आयसीसीच्या नव्या नियमाचा 'या' प्लेअरला दणका

आयसीसीने काही दिवसांपूर्वीच आपले नवे नियम लागू करण्याची घोषणा केली होती. हे नवे नियम २८ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या नियमांचा पहिला फटका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला बसला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 30, 2017, 06:13 PM IST
VIDEO: आयसीसीच्या नव्या नियमाचा 'या' प्लेअरला दणका title=
File Photo

नवी दिल्ली : आयसीसीने काही दिवसांपूर्वीच आपले नवे नियम लागू करण्याची घोषणा केली होती. हे नवे नियम २८ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या नियमांचा पहिला फटका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला बसला आहे.

२८ सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेल्या नियमांचा फटका ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्नस लबशेयन या प्लेअरला बसला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या एका स्थानिक क्रिकेटमध्ये क्विन्सलँड बुल्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ या दोन टीम्समध्ये मॅच सुरु होती. या मॅच दरम्यान 'फेक फिल्डिंग' प्रकरणी मार्नस लबशेयन नावाच्या प्लेअरवर कारवाई करण्यात आली आहे.

मार्नसवर आरोप आहे की, त्याने मॅच दरम्यान फेक थ्रो करत बॅट्समनला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. झालं असं की, क्विन्सलँड बुल्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ यांच्यात मॅच सुरु होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन प्लेअरने शॉट मारला आणि बॉल मार्नसकडे गेला. त्यावेळी मार्नसने फेक थ्रो करत बॅट्समनला गोंधळात टाकलं. त्यामुळे अंपायरनी यावर आक्षेप घेत आयसीसीच्या नव्या नियमानुसार क्विन्सलँड बुल्स टीमला ५ रन्सचा दंड ठोठावला.