रोनाल्डोने खरेदी केली १९ कोटींची सुपरकार

फुटबॉल विश्वातील सुपरस्टार प्लेअर असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डो हा कारचा खूप मोठा शौकिन आहे. रोनाल्डोकडे अनेक सुपरकार आहेत. या कारमध्ये आता आणखीन एका कारची भर पडली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 29, 2017, 08:49 PM IST
रोनाल्डोने खरेदी केली १९ कोटींची सुपरकार  title=

नवी दिल्ली : फुटबॉल विश्वातील सुपरस्टार प्लेअर असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डो हा कारचा खूप मोठा शौकिन आहे. रोनाल्डोकडे अनेक सुपरकार आहेत. या कारमध्ये आता आणखीन एका कारची भर पडली आहे.

रोनाल्डोने नुकतीच सुपरकार बुगाटी शिरोन खरेदी केली आहे. या कारची किंमत ३ मिलियन डॉलर म्हणजेच १९ कोटी रुपये आहे. यापूर्वीही रोनाल्डोने बुगाटीची कार खरेदी केली होती आणि या कारची किंमत १८ कोटी रुपये होती.

रोनाल्डोजवळ लॅम्बॉर्गिनी, रॉल्स रॉयस, एस्टन मार्टिन डीबी ९, पोर्श सारख्या सुपरकार आहेत. रोनाल्डोने आता खरेदी केलेली शिरोन ही कार केवळ ४२ सेकंदांत २६१ किमी प्रति तास वेग घेते.

 

New animal in the building Bugatti Chiron 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

रोनाल्डोने आपली नवी बुगाटी शिरॉन कारचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत रोनाल्डो आपली सुपरकार ड्राईव्ह करताना पहायला मिळत आहे.