Ind vs Aus, WTC Final 2023: सर्वांना उत्सुकता असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्याला आता फक्त 2 दिवस शिल्लक आहे. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs india) यांच्यातील ऐतिहासिक सामन्यापूर्वी कांगारूंना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जॉश हेजलवूड (Josh Hazlewood) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. आयसीसीने (ICC) ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता रोहित आणि विराटचं टेन्शन संपलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
जॉश हेजलवूड (Josh Hazlewood) हा ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज आहे. भल्या भल्यांच्या दांड्या गुल करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मात्र आता तो संघात नसल्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ झालीये. जॉश हेजलवूडच्या जागी आता मायकल नेसर (Michael Neser) याची संघात वर्णी लागली आहे. आयपीएलमध्ये हेजलवूड आरसीबीकडून खेळत होता. मात्र, फिटनेसमुळे तो यंदा एकही सामना खेळला नाही. टेस्ट क्रिकेट फायनल आणि अॅशेस मालिका (Ashes series) खेळण्यासाठी त्याने विश्रांती घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता तो पुन्हा अनफीट असल्याचं सांगितलं जातंय.
JUST IN: Setback for Australia as star quick is ruled out of #WTC23 Final against India!
Details
— ICC (@ICC) June 4, 2023
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ (व्हाईस कॅप्टन), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ENG vs AUS) खेळली जाणारी अॅशेस सीरिज येत्या 16 जून ते 31 जुलै या कालावधीत खेळवली जाणार आहे. मानाची अशी ही सीरिज जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे दोन्ही संघ जिवाचं रान करतात. त्यामुळे आता जॉश हेजलवूडला आराम देण्यात आल्याचं बोललं जात आहे
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.