Australia vs South Africa : रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर आता कांगारूंनी थेट सेमीफायनल गाठली (Australia Into the Semis) आहे. सुरूवातीच्या पडझडीनंतर ऑस्ट्रेलियाने स्वत:ला सावरलं अन् मागील 5 ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया संघाचे 8 सामन्यात 12 अंक झाले असून ऑस्ट्रेलियाने तिसरं स्थान कायम ठेवलंय. तर दुसरीकडे साऊथ अफ्रिका देखील 12 अंकासह दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांना काही केल्या आता पहिलं स्थान गाठता येणार नाही. तर चौथ्या स्थानी अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया घसरू शकत नाही. त्यामुळे आता साऊथ अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल खेळणार, हे आता पक्कं झालंय.
यंदाचा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने रोमांचक राहिला आहे. सेमीफायनलसाठी पहिले तीन संघ निश्चत झाल्यानंतर आता चौथ्या स्थानी कोण? हा मिलियन डॉलर प्रश्न उभा राहिला आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान या तिन्ही संघापैकी कोणता संघ सेमीफायनल गाठणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या तिन्ही संघाकडे प्रत्येकी 8 गुण आहेत. मात्र, सध्या सर्वात जास्त पारडं न्यूझीलंडचं जड वाटतंय. न्यूझीलंडचा नेट रननेट +0.398 आहे. तर पाकिस्तानचा नेट रननेट +0.036 असल्याने पाकिस्तानला आगामी सामन्यात सर्वात मोठा विजय नोंदवावा लागेल. तर अफगाणिस्तानला आगामी सामन्यात साऊथ अफ्रिकेचं आव्हान पार करून मोठा विजय मिळवावा लागेल.
साउथ अफ्रीका (South Africa Team) : तेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्ज़ी, क्विंटन डी कॉक, रीज़ा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कगिसो रबाडा, तबरेज़ शम्सी, रासी वैन डेर डुसेन, लिजाड विलियम्स.
ऑस्ट्रेलिया (Australia Team): पॅट कमिंस (कॅप्टन), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन एबॉट, कॅमरन ग्रीन, जॉश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, मिच मार्श, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर, एडम झॅम्पा, मिशेल स्टार्क.