पर्थ : क्रिकेटमध्ये प्रत्येक टीम ही ११ खेळाडू घेऊन मैदानात उतरते, मग तो फॉरमॅट कोणताही असो. पण टेस्ट क्रिकेटमध्ये दोन्ही टीम १० खेळाडू घेऊन खेळत असल्याची घटना घडली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पर्थमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरु आहे. या टेस्ट मॅचमध्ये दोन्ही टीमचे दोन खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे उरलेल्या टेस्ट मॅचमध्ये ते खेळू शकणार नाहीत.
या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला आणि तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला धक्का लागला. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसनच्या मांसपेशींना दुखापत झाली, त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी ११ ओव्हरच टाकू शकला. तर ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जॉस हेजलवूड याच्याही मांसपेशींना दुखापत झाली आहे. हेजलवूड हा फक्त ८ बॉल टाकून मैदानाबाहेर गेला.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये डे-नाईट टेस्ट मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये ४१६ रन केल्यानंतर न्यूझीलंडचा १६६ रनवर ऑल आऊट झाला, यामुळे ऑस्ट्रेलियाला २५० रनची आघाडी मिळाली. फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने ९२ रन देऊन ५ विकेट घेतल्या, तर नॅथन लायनला २ आणि हेजलवूड-कमिन्सला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.