AUS vs WI Mitchell Starc Record: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) केलेल्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs WI) यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका (Test Series) खेळवली जात आहे. पहिल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला होता. पहिले दोन टेस्ट सामने ड्रॉ राहिल्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यानंतर आता येत्या 8 डिसेंबरपासून अखेरचा कसोटी सामना (AUS vs WI 4th test) खेळवला जाणार आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) अनोखा रेकॉर्ड नावावर केला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (West Indies vs Australia) यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 164 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करत दोन्ही डावात 4 विकेट घेतले. त्याने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारिन चंद्रपॉलला (Tagenarine Chanderpaul) बाद करून अनोखा विक्रम नावावर केला आहे.
मिचेल स्टार्कने (Mitchell Starc Record) अनोखा रेकॉर्ड नावावर केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये बाप लेकाला आऊट करण्याचा नवा रेकॉर्ड त्यानं आपल्या नावावर केला आहे. तब्बल 10 वर्षापूर्वी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना होता. त्यावेळी स्टार्कने शिवनारायण चंद्रपॉलला (Shivnarine Chanderpaul) एलबीडब्ल्यू आऊट केलं होतं. या सामन्यात चंद्रपॉल 68 धावांवर आऊट झाला होता.
आणखी वाचा - IND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!
दरम्यान, शिवनारायण चंद्रपॉलला (Shivnarine Chanderpaul) आऊट केल्यानंतर आता स्टार्कने लेकाला म्हणजेच तेजनारिन चंद्रपॉलला क्लिन बोल्ड (Clean bold) केलंय. स्टार्कने दुसऱ्या डावात 45 वर खेळत असलेल्या रनवर चंद्रपॉलला क्लीन बोल्ड केलं. तेजनारिन चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजचा (WI) महान खेळाडू शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा आहे. वडिलांप्रमाणे आपणही क्रिकेटर व्हावं, अशी इच्छा उराशी बाळगणाऱ्या तेजनारिन चंद्रपॉलने अखेर ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू केला आहे.