नवी दिल्ली: पुढील महिण्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेगाचा बादशाहा उसैन बोल्ट हा पाहुणा असणार आहे. या स्पर्धेत तो १०० मीटर फायनल पाहणा आहे. या स्पर्था गोल्ड कोस्ट येथे होणा आहेत.
माजी विश्वविजेता योगान ब्लॅक याने ही माहिती दिली आहे. ३१ वर्षीय बोल्टने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लंडन येथे झालेल्या जागतीक चॅम्पीयनशिपनंतर निवृत्ती घेतली आहे. धावपटू म्हणून करिअर केल्यावर आता त्याला फुटबॉलचे वेध लागले आहेत.
दरम्यान, योगान ब्लॅक हा १५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या राष्ट्रमंडल खेळासाठी सिडनीला पोहोचला आहे. तो म्हणाला की, आठ वेळा ऑलिम्पीक चॅम्पीयन अर्थातच १०० मीटर आणि २०० मीटर धावण्यात जागतीक विक्रम केलेला वेगाचा बादशाहा १०० मीटरची फायनल पाहण्यासाठी येणार आहे.