Asia Cup दरम्यान मोठी बातमी, या ऑलराऊंडर क्रिकेटपटूने घेतली अचानक निवृत्ती

अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, क्रिकेट विश्वात आश्चर्य  

Updated: Aug 31, 2022, 02:19 PM IST
Asia Cup दरम्यान मोठी बातमी, या ऑलराऊंडर क्रिकेटपटूने घेतली अचानक निवृत्ती title=

Cricket News : एशिया कप क्रिकेट स्पर्धा (Asia Cup 2022) सुरु असतानाच क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा  (Team New Zealand)ऑलराऊंडर Allrounder कॉलिन डी ग्रँडहोमने (Colin de Grandhomme) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ग्रँडहोमने अचानक घेतलेल्या या निर्णयाने क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय
दुखापत आणि क्रिकेटमध्ये वाढत चाललेली स्पर्धा यामुळे ग्रँडहोमने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्याचं बोललं जातंय. दुखापतीमुळे सातत्यपूर्ण कामगिरी करता येत नाहीए, माझी मुलंही आता मोठी होत आहेत, त्यामुळे क्रिकेटनंतर मुलांच्या भविष्यावर लक्ष केंद्रीत करायचं असल्याची प्रतिक्रिया ग्रँडहोमने व्यक्त केली. 

न्यझीलंज संघाला धक्का
झिम्बाब्वेत जन्मलेल्या ग्रँडहोमने 2012 मध्ये न्यूझीलंडकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. न्यूझीलंडकडून ग्रँडहोम 29 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 38.70 च्या रनरेटने 1432 धावा केल्यात. यात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतकांचाही समावेश आहे. याशिवाय कसोटी सामन्यात त्याने 49 विकेटही घेतल्या आहेत. 

तर 45 एकदिवस सामन्यात त्याने 742 धावा आणि 30 विकेट घेतल्या आहेत. 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपस्पर्धेत न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्या संघात ग्रँडहोमही होता. या अष्टपैलू खेळाडूने 41 टी20 सामन्यात 505 धावा केल्या असून 12 विकेटही त्याच्या नावावर आहेत.