उद्या रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅच म्हणजेच दोन्ही देशातील क्रीडा प्रेमींसाठी एक पर्वणीच असते 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 14, 2017, 06:01 PM IST
उद्या रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच title=
File Photo

ढाका : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅच म्हणजेच दोन्ही देशातील क्रीडा प्रेमींसाठी एक पर्वणीच असते. आता हीच पर्वणी पून्हा एकदा क्रीडा प्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय टीमने दोन मॅचेस जिंकल्या आहेत त्यामुळे टीमचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यानंतर आता भारतीय टीम रविवारी पाकिस्तान विरोधात लढणार आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेत 'अ' गटातील भारतीय टीमने बांगलादेश आणि जापान यांच्यावर सहज विजय मिळवला. सुरुवातीच्या मॅचमध्ये जापानला ५-१ ने पराभूत केलं. त्यानंतर बांगलादेशला ७-०ने धुळ चारली.

तर, दुसरीकडे पाकिस्तानच्या टीमने बांगलादेशवर ७-०ने विजय मिळवला आणि जापानने २-२ ने मॅच ड्रॉ केली. 'अ' गटात भारतीय टीमने सहा पॉईंट्स मिळवत अव्वल क्रमांक गाठला आहे तर पाकिस्तान चार पॉईंट्स मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय टीमने दोन मॅच जिंकत सुपर फोरमध्ये प्रवेश केला. पहिल्या दोन मॅचेसमध्ये भारतीय टीमने कलात्माक खेळ दाखवला. बांगलादेश विरोधात भारताला १३ पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र, दोनच वेळा गोल करता आला.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणारी मॅच केवळ रोमांचक नाही तर तणावपूर्णही असते. भारतीय टीमला रविवारी पाकिस्तान विरोधात खेळताना एकाग्रतेने खेळलं पाहिजे. एकाग्रता भंग झाल्यास त्याचा फटका भारतीय टीमला बसू शकतो.

जुन महिन्यात झालेल्या हिरो हॉकी वर्ल्ड लीग सेमी फायनल मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला ६-१ ने पराभूत केलं होतं.