IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे. रविवारी म्हणजे 23 जुलै रोजी भारत-पाकिस्तान ( IND vs PAK ) सामना रंगणार आहे. एसीसी मेन्स इमर्जिंग एशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान ( IND vs PAK ) एकमेंकाविरोधात येणार आहेत. 10 वर्षांनंतर इमर्जिंग आशिया कपच्या विजेतेपदाच्या लढतीत दोन्ही आमनेसामने येणार आहेत.
21 जुलै रोजी ACC मेन्स इमर्जिंग आशिया कप 2023 ( ACC Emerging Teams Asia Cup ) मध्ये दोन उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. यावेळी पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मोहम्मद हरिसच्या नेतृत्वाखालील संघाने 60 रन्सने विजय नोंदवला.
यावेळी दुसरा सामना भारत विरूद्ध बांगलादेश ( IND vs BAN ) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यामध्ये यश धुल, निशांत सिंधू आणि मानव सुथरा यांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने ( Team India ) हा सामना 51 रन्सने सामना जिंकला. यासह पाकिस्तान आणि भारताने ACC मेन्स इमर्जिंग आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीचं तिकीट निश्चित केले.
एसीसी मेन्स इमर्जिंग एशिया कप ( ACC Emerging Teams Asia Cup ) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी म्हणजेच 23 जुलै रोजी होणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) मेगा मॅच पाहायला मिळणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होणार आहे.
स्टार स्पोर्ट्स 1/1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी/1 एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, 1 तेलुगु आणि 1 कन्नड या ठिकाणी चाहत्यांना हा सामना पाहता येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी चाहते मात्र फार उत्सुक आहेत.