#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का

#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय. 

नेहा चौधरी | Updated: Sep 17, 2023, 09:33 AM IST
#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का title=
Asia cup Final 2023 rohit sharma shubman gill fight argument in public video viral on Internet

#AsiaCupFinal : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियवर आज आशिया कपवर नाव कोरण्यासाठी भारत आणि श्रीलंकामध्ये घमासान होणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचं बोलं जातं आहे. कारण आतारपर्यंत आशिया कपचा इतिहासात भारतीय संघाने 7 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. टीम इंडिया आशिया कप भारतात आणण्यासाठी सज्ज असताना भारतीय संघात काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. (Asia cup Final 2023 rohit sharma shubman gill fight argument in public video viral on Internet trending news)

यासाठी कारण ठरलं आहे, सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. लोकांसमोर कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचं भांडण झालं, असं या व्हिडीओवरून वाटतं आहे. (IND vs SL Final)

रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण?

आशिया कप फालनलपूर्वी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता हे खेळाडू लिफ्टबाहेर उभे आहेत. व्हिडीओ नीट पाहिल्यावर असं दिसतंय की, शुभमन रोहितला काहीतरी विचारतोय. त्यावर रोहित त्याला अरे मेरे से नहीं होगा, पागल है क्या? असं उत्तर दिलं. 

खरं तर शुभमन गिल याने रोहितला काय विचारलं हे स्पष्ट ऐकू येत नाही आहे. पण या रोहितच्या उत्तरावरून या दोघांमध्ये कशावरुन वाद झाला का अशी चर्चा रंगली आहे. तसं तर हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याबद्दल काही माहिती मिळालेली नाही.  दरम्यान CricWatcher या ट्वीटर म्हणजे X वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

आशिय कप फायनलवर पावसाचं सावट

आशिया कपसाठी आतापर्यंत झालेल्या सामन्यामंध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे आज आशिया कप फायनल भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. अशात हवामान विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे. खराब हवामानमुळे पावसामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जर आज हा सामना झाला नाही तर उद्या म्हणजे सोमवारी 18 सप्टेंबरला या राखीव दिवशी तो खेळला जाईल. दरम्यान भारताने सुपर 4 मध्ये अव्वल स्थान पटकावलंय.