Arshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप ट्रोलर्सच्या निशाण्यावर, आई-वडिलांचा संयम सुटला, म्हणाले...

आजी-माजी खेळाडूंनंतर आता अर्शदीपला घरातूनही पाठिंबा, आई-वडिलांकडून ट्रोल्सना जशास तसं उत्तर

Updated: Sep 5, 2022, 10:42 PM IST
Arshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप ट्रोलर्सच्या निशाण्यावर, आई-वडिलांचा संयम सुटला, म्हणाले...  title=

Arshdeep Singh Parents To Trollers: एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) पराभवानंतर टीम इंडियाचा (Team India) युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. यानंतर भारतीय टीमसह अनेक दिग्गज खेळाडू अर्शदीपच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. अर्शदीपच्या पालकांनीही यावर मौन सोडलं असून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

अर्शदीपच्या पालकांचं प्रत्युत्तर
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अठराव्या ओव्हरमध्ये अर्शदीपनने आसिफ अलीचा कॅच सोडला. यानंतर आसिफ अलीने फटकेबाजी करत पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. अखेरच्या षटकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या पराभवानंतर अर्शदीपला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. यावर अर्शदीपच्या वडिलांनी उत्तर दिलं आहे. जी लोकं अर्शदीपवर टीका करत आहेत तीच लोकं एक दिवस अर्शदीपला डोक्यावर घेऊन नाचतील.

सामना संपल्यानंतर पॅव्हेलिअनमधून बाहेर येत अर्शदीपने आपल्याला मिठी मारल्याचं त्याच्या आईने सांगितलं. अर्शदीप टीकाही सकारात्मक घेत असल्याचं त्याच्या आईने म्हटलं आहे. या सामन्यात अर्शदीपने 3.5 षटकात 27 धावा देत 1 विकेट घेतली. गोलंदाज म्हणून तो यशस्वी ठरला, पण ती एक कॅच सोडल्याने तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला.

विराट कोहलीनेही केलं समर्थन
सामन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने (Virat Kohli) अर्शदीप सिंहचा बचाव केला. प्रचंड दबाव असलेल्या सामन्यात कोणाकडूनही चूक होऊ शकते. अर्शदीप सिंह युवा खेळाडू आहे, हळू हळू यातून तो शिकत जाईल असं विराटने म्हटलंय. तर भारताचा माजी स्पीन गोलंदाज आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंह (Harbhajan Singh) यानेही अर्शदीपचं समर्थन केलं आहे. आकाश चोप्राने (Akash Chopra) तर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईलवर अर्शदीपचा फोटो ठेवला आहे.