Asia Cup मध्ये पहिल्यांदाच खेळणार 'या' छोट्या देशाची टीम, भारत-पाकिस्तानला भिडणार

Asia Cup: आशिया चषक 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळचा आशिया चषक 2023 हा पाकिस्तानच्या यजमानपदात खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. तसेच विशष म्हणजे यावेळेस एक नवीन संघ स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 18, 2023, 01:16 PM IST
Asia Cup मध्ये पहिल्यांदाच खेळणार 'या' छोट्या देशाची टीम, भारत-पाकिस्तानला भिडणार title=

Asia Cup 2023: आशिया चषक 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळचा आशिया चषक 2023 हा पाकिस्तानच्या यजमानपदात खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. तसेच विशष म्हणजे यावेळेस एक नवीन संघ स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या संघाचा भारत आणि पाकिस्तानच्या गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच ही टीम  भारत आणि पाकिस्तानला टीम्सना भिडताना दिसणार आहे.

आशिया कपमध्ये पहिल्यांदाच 

आशिया चषक 1984 पासून आयोजित केला जात यंदा १६ वा एकदिवसीय सिझन खेळविला जाणार आहे. यामध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात नेपाळचा क्रिकेट संघ प्रथमच खेळणार आहे. याशिवाय उर्वरित संघांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

2 गट, 6 संघ आणि 13 सामने

आशिया चषक 2023 मध्ये लीग स्टेज, सुपर-4 आणि फायनल असे एकूण 13 सामने खेळविला जाणार आहेत. आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळला जाईल. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळचे संघ एकाच गटात असतील. तर इतर संघ त्याच गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आहेत. आशिया कपमध्ये अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ 2-2 सामने खेळेल. जे संघ सुपर-4 मध्ये पोहोचतील, ते 3-3 सामने खेळतील. मागच्या वेळेस श्रीलंकेने आशिया कप जिंकला होता.

यूएई संघाचा पराभव करून केले स्थान निर्माण

नेपाळच्या टीमने काठमांडू येथील टीयू क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या एसीसी पुरुष प्रीमियर चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेपाळ संघाने संयुक्त अरब अमिराती (UAE) ला पराभूत केले. यामुळे आशिया चषकमध्ये आपले स्थान निश्चित केले. गेल्या वेळी या मेगा स्पर्धेत 'यूएई' सहावा संघ म्हणून सहभागी झाला होता. परंतु यावेळी तो आशिया कपचा भाग असणार नाही