दीड महिन्यात दोनदा डावललं... 'या' खेळाडूसाठी Team India चं दार बंद? World Cup मधूनही डच्चू?

Asia Cup 2023 Team India Squad: 21 ऑगस्ट रोजी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 17 खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाची घोषणा केली. हा संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असून यामधूनच वर्ल्डकपचा संघ निवडला जाईल अशी शक्यता आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 23, 2023, 08:38 AM IST
दीड महिन्यात दोनदा डावललं... 'या' खेळाडूसाठी Team India चं दार बंद? World Cup मधूनही डच्चू? title=
सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली

Asia Cup 2023 Team India Squad: आशिया चषक स्पर्धेसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड झाली. भारतीय संघाची घोषणा 21 ऑगस्ट रोजी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी केली. 17 खेळाडूंच्या या संघामध्ये भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलचा समावेश नसल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघामधूनच या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपसाठी संघ निश्चित केला जाईल असं मानलं जात आहे. त्यामुळेच आता चहलला वर्ल्डकपमध्येही संधी मिळणार नसल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे.

याच संघातून वर्ल्डकपचा संघ निवडणार

एशिया चषकासाठी संघाच्या घोषणेची मागील बऱ्याच काळापासून चर्चा होती. भारतामध्येच या वर्षाच्या शेवटी म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपसाठी याच 17 जणांमधून संघ निवडला जाईल असं म्हटलं जात आहे. क्रिकेटमधील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार हाच संघ घेऊन भारत भविष्यातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उतरण्याची दाट शक्यता आहे. आशिया चषकाच्या संघामध्ये चहलचं नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. चहल संघामध्ये हवा होतं असं अनेकांचं म्हणणं आहे.

नक्की वाचा >> Asia Cup 2023 मधून डावलल्याने चहल दुखावला! एकही शब्द नसलेली 'ती' पोस्ट चर्चेत

रोहितने ती शक्यता फेटाळली

आशिया चषक स्पर्धेमध्ये न निवडलेल्या खेळाडूंसाठी संघाची दारं बंद झाली का? असा प्रश्न संघ जाहीर झाल्यानंतरच्या पत्रकारपरिषदेमध्ये कर्णधार रोहित शर्माला विचारण्यात आला. त्यावेळेस रोहित शर्माने अशापद्धतीने दारं बंद होण्याचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं. संघाच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड करण्यात आल्याचं रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रोहितच्या या प्रतिक्रियेवरुन चहलला संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र आशिया चषक स्पर्धेनंतर वर्ल्डकप आधी भारतीय संघ फारच कमी सामने खेळणार असल्याने चहलला संधी कशी आणि कुठे मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

नक्की पाहा >> Video: विराटसंदर्भातील रोहितचं 'ते' विधान ऐकून Chief Selector आगरकरसहीत सगळेच हसू लागले

दीड महिन्यात दोनदा डावललं

जुलै महिन्यामध्ये आशिया खेळांसाठी भारतीय संघाची निवड झाली होती. त्यामध्ये ज्या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे त्यांना विश्वचषक स्पर्धेपासून मुकावं लागणार आहे. या दोन्ही स्पर्धा फारच कमी कालावधीत खेळवल्या जाणार असल्याने यापैकी एकाच स्पर्धेत खेळाडूंना खेळता येईल असं सांगितलं जात आहे. मात्र युजवेंद्र चहलचं नाव आशियाची खेळांच्या संघातही नाही आणि आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघातही नाही. दीड महिन्यांमध्ये चहलला निवड समितीने 2 वेळा डावललं आहे.

नक्की वाचा >> Asia Cup स्पर्धेत Mumbai Indians चा संघ भारताकडून खेळणार! सोशल मीडियावर टीकेची झोड

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

राखीव खेळाडू- संजू सॅमसन