एशिया कप स्पर्धेतून वाईट बातमी! स्टार वेगवान गोलंदाजाला दुखापत, वर्ल्ड कप खेळवण्यावरही प्रश्नचिन्ह

Team India News: पाकिस्तान आणि श्रीलंकेत सुरु असलेल्या एशिया कप स्पर्धेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाजाला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे या गोलंदाजाला सामना अर्धवट सोडून बाहेर पडावं लागलंय.

Updated: Sep 6, 2023, 07:45 PM IST
एशिया कप स्पर्धेतून वाईट बातमी! स्टार वेगवान गोलंदाजाला दुखापत, वर्ल्ड कप खेळवण्यावरही प्रश्नचिन्ह title=

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेतून एक मोठी बातंमी समोर आली आहे. पाकिस्तानाचा (Pakistan) वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) दुखापतग्रस्त झाला आहे. सुपर-4 मध्ये बंगालादेशविरुद्धच्या सामन्यात नसीम शाहच्या डाव्या हाताला दुखापत झाली. सुपर-फोरच्या सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा फलंदाज मोहम्मद नईमने शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर फटका लगवाला. बाऊंड्री अडवण्यासाठी नसीने डाव्या बाजूला उडी मारली. पण यात त्याच्या डाव्या हाताला दुखापत (Injury) झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला तात्काळ मैदानाबाहेर जावं  लागलं. 

पाकस्तान क्रिकेट संघाचे फिजीओंनी नसीमवर मैदानाबाहेर काही प्राथिमिक उपचार दिले. पण त्यानंतर बराच वेळ नसीम बाऊंड्रीच्या बाहेर जमिनीवर पडून होता. नसीमची दुखापत किती गंभीर याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2023) सुपर-4 चे सामने सुरु झाले आहेत. 10 सप्टेंबरला पाकिस्तानचा भारताविरुद्ध महत्त्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी नसीम शाहच्या दुखापतीमुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा  (ODI WC 2023) खेळवली जाणार आहे. त्याआधी नसीम शाह दुखापतीतून बरा होणार का याकडे पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

एशिया कप स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदांजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशिया कप स्पर्धेत नसीमने तीन सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. ग्रुप सामन्यात भारताविरुद्धही नसीमने जबरदस्त गोलंदाजी केली होती. अवघ्या 36 धावांत त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. 

बांगलादेशविरुद्धच्या सुपर फोरच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर नसीम खानने विकेट घेतली. बांगलादेशचा गोलंदाज मेहदी हसन मिराजला त्याने पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. 

नसीम शाहची क्रिकेट कारकिर्द
नसीने शाहने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात कमी वयाचा नववा खेळाडू ठरला. 2019 मध्येच नसीमने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाच विकेट घेतल्या. हा देखील एक विक्रम ठरला. कमी वयात पाच विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज होता. 2020 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात नसीमने हॅटट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो सर्वात लहान वयाचा गोलंदाज बनला.