Sport News : आशिया कपच्या सुपर 4 संघांमध्ये मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगवर (PAK vs HKG) 155 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह सुपर 4 (Super 4) मध्ये स्थान मिळवलं आहे. त्यानंतर उर्वरित संघांमध्ये अशा लढती रंगणार आहेत.
चार संघांमध्ये अशा रंगणार लढती
श्रीलंका वि. अफगाणिस्तान 3 सप्टेंबर, शारजाह
भारत वि. पाकिस्तान 4 सप्टेंबर, दुबई
भारत वि. श्रीलंका 6 सप्टेंबर, दूबई
अफगाणिस्तान वि. पाकिस्तान 7 सप्टेंबर, शारजाह
भारत वि. अफगाणिस्तान 8 सप्टेंबर, दुबई
श्रीलंका वि. पाकिस्तान 9 सप्टेंबर, दुबई
फायनल सामना 11 सप्टेंबरला दुबईमध्येच रंगणार
India and Afghanistan top their respective groups after 2 convincing wins each.
Pakistan and Sri Lanka won their final game of the group stage and move forward to the Super 4 round!#ACC #AsiaCup2022 #GetReadyForEpic pic.twitter.com/r0GTuj4ELI— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 2, 2022
भारताने पाकिस्तान आणि हॉंगकॉंग संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानला एकदा पराभवाचा सामना करावा लागला होता. उद्याचा रविवारही सुपर सनडे असणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाक सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनाही उत्सुकता लागलेली असते.
आशिया चषक 1984 मध्ये सुरू झाला आहे. टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत 7 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. श्रीलंकेने 5 आणि पाकिस्तानने दोनदा विजेतेपद पटकावलं आहे. यंदा कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे