Asia Cup 2022: टीम इंडिया-पाकिस्तान 4 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने

asia cup 2022 : आता सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 4 सप्टेंबरला रविवारी भारताविरुद्ध (Ind vs Pak) होणार आहे. 

Updated: Sep 2, 2022, 11:24 PM IST
Asia Cup 2022: टीम इंडिया-पाकिस्तान 4 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने title=

यूएई : आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानने हाँगकाँगवर (PAK vs HKG) 155 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय. पाकिस्तानने या विजयासह सुपर 4  (Super 4) मध्ये स्थान मिळवलंय. आता सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 4 सप्टेंबरला रविवारी भारताविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानने या सामन्यात हाँगकाँगसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य दिलं होतं. मात्र या सामन्यात हाँगकाँगचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. हॉंगकॉंग 38 धावांवर ऑलआऊट झाली. (asia cup 2022 hkg vs pak pakistan beat hongkong team india and pakistan face again on 4 september)

पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद नवाझने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नसीम शाहने 2 आणि शहानवाज दहानीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. त्याआधी मोहम्मद रिझवानने केलेल्या 78 रन्सच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 2 विकेट्स 193 धावांपर्यंत मजल मारली. यासह पाकिस्तान आशिया कप 2022 मध्ये सुपर 4 मध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरलीय.

हाँगकाँग प्लेइंग इलेव्हन : यासिम मुर्तजा, निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅक्कनी (विकेटकीपर), जीशान अली, हारून अरशद, एहसान खान, मोहम्मद गजनफर आणि आयुष शुक्ला.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फखर जमां, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहबाज.

Asia Cup 2022: सुपर-4 वेळापत्रक

3 सप्टेंबर - श्रीलंका vs अफगानिस्तान

4  सप्टेंबर - भारत vs पाकिस्तान

6  सप्टेंबर - भारत vs श्रीलंका

7  सप्टेंबर - पाकिस्तान vs अफगानिस्तान

8  सप्टेंबर - भारत vs अफगानिस्तान

9 सप्टेंबर - श्रीलंका vs पाकिस्तान