India Vs Pakistan: पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, भारतीय संघात 3 बदल

आशिया चषक 2022 स्पर्धेतील सुपर 4 स्पर्धेत पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Sep 4, 2022, 07:29 PM IST
India Vs Pakistan: पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, भारतीय संघात 3 बदल title=

India Vs Pakistan: आशिया चषक 2022 स्पर्धेतील सुपर 4 स्पर्धेत पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियामध्ये दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या आणि रवि बिश्णोई यांना संधी देण्यात आली आहे. तर दिनेश कार्तिकला आराम देण्यात आला आहे.

रवींद्र जडेजाला दुखापत झाल्याने आशिया कपमधून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी एका खेळाडूचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र संघ व्यवस्थापनाने 3 बदल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दिनेश कार्तिकच्या जागी दीपक हुडा, रवींद्र जडेजाच्या जागी हार्दिक पांड्या आणि आवेश खानच्या जागी रवी बिश्नोईला स्थान दिलं आहे. 

आठवडाभरात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसऱ्यांदा स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. आता पाकिस्तानचा संघ पराभवाचा बदला घेण्यासाठी आतुर आहे. त्याचबरोबर आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाला आपला दबदबा कायम ठेवायचा आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारताची पाकिस्तानपेक्षा चांगली कामगिरी आहे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत 15 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 9 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रवि बिश्णोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह

पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद,  खुशदिल शाह,  शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शहा