मुंबई : आशिया कपची सुरुवात येत्या 27 ऑगस्टपासून होणार आहे. या कपची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या भारतीय चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी आहे. भारत पाकिस्तान आता मैदानातचं नाही तर मैदानाबाहेर देखील भिडताना दिसणार आहे. त्यामुळे नेमकी ही मैदानाबाहेर कशी लढत होणार आहे, ते जाणून घेऊयात.
संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 27 ऑगस्टपासून आशिया कपची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्येही मैदानात लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यात आता मैदानाबाहेरही भारत आणि पाकिस्तानमध्ये लढत होणार आहे. मैदानाबाहेरील या लढतीची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
मैदानाबाहेरची लढत म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे अनेक समालोचक या आशिया कपमध्ये समालोचन करणार आहेत. आशिया चषकासाठी समालोचकांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत रवी शास्त्री, गौतम गंभीर, वसीम अक्रम, वकार युनूस यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर लढताना दिसणार आहेत. त्याचवेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही देशांच्या दिग्गज खेळाडूंमध्ये शाब्दीक सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे समालोचकांची जुगलबंदीचा भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना अनुभवताना येणार आहे.
आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका, गतविजेते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी पात्रता स्पर्धेनंतर सहावा आणि अंतिम संघ निश्चित केला जाईल. पात्रता स्पर्धा 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारत 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
आशिया कपसाठी हिंदी समालोचक: संजय मांजरेकर, रवी शास्त्री, गौतम गंभीर, आकाश चोप्रा, जतीन सप्रू, संजय बांगर, दीप दासगुप्ता आणि इरफान पठाण.
आशिया कपसाठी इंग्लिश समालोचक: रवी शास्त्री, इरफान पठाण, गौतम गंभीर, रसेल अर्नोल्ड, दीप दासगुप्ता, स्कॉट स्टायरिस, संजय मांजरेकर, वसीम अक्रम, वकार युनूस, अथर अली खान.