Arjun Tendulkar : यंदाच्या आयपीएलपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या नावाची प्रचंड चर्चा होऊ लागलीये. आयपीएल 2023 मध्ये अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केला होता. यानंतर आता अर्जुन देवधर ट्रॉफीमध्ये त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवतोय. पुद्दुचेरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या देवधर ट्रॉफीमध्ये 9 वा सामना साऊथ झोन विरूद्ध नॉर्थ ईस्ट झोन ( South Zone vs North East Zone ) असा खेळवण्यात आला होता. यामध्ये अर्जुनने त्याच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा फलंदाजांची दाणादाण उडवलीये.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) या सामन्यात उत्तम गोलंदाजी केली. यावेळी विरूद्ध टीम नॉर्थ ईस्ट झोन 136 रन्सवर ऑल आऊट झाली. यानंतर साऊथ झोनने अवघ्या 19 ओव्हर्समध्ये हा सामना 9 विकेट्सने जिंकला.
शुक्रवारी साऊन झोन विरूद्ध नॉर्थ ईस्ट झोनच्या ( South Zone vs North East Zone ) सामन्यात अर्जुनने तुफान गोलंदाजी करत 1 विकेट देखील घेतली. अर्जुनने (Arjun Tendulkar) 7 ओव्हर्समध्ये केवळ 3 च्या इकोनॉमीने तब्बल 21 रन्स दिले आहेत. इतकंच नव्हे तर अर्जुनने यावेळी 2 मेडन ओव्हर्स देखील फेकल्या आहेत. अर्जुनने ओपनिंगला आलेल्या अनुप अहलावला अवघ्या 2 रन्सवर माघारी धाडलं.
देवधर ट्रॉफी स्पर्धेच्या 9 व्या सामन्यात साऊथ झोनने नॉर्थ ईस्ट झोन टीमचा 9 गडी राखून पराभव केला. साऊथ झोन टीमच्या घातक गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या उत्तर पूर्व विभागाचा डाव 136 रन्समध्ये गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ झोनने 19 ओव्हर्समध्ये 1 विकेट गमावून सामना जिंकला.
आयपीएल 2023 मध्ये मुंबईविरुद्ध पदार्पण केल्यानंतर, चाहते त्याच्या टीम इंडियामध्ये डेब्यूची वाट पाहतायत. अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शकते.
गेल्या वर्षी अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) ने रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू केलं होतं. यावेळी डेब्यू सामन्यातच त्याने शतक झळकावत त्याने स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलं होतं. रणजीमध्ये अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) नेही शानदार गोलंदाजी केली होती. मात्र अशातच गोवा क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफीच्या पुढच्या सिझनसाठी खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केलीये. या यादीमध्ये एकूण 28 खेळाडूंचं नाव आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 28 जणांमध्ये अर्जुनचं नाव नाहीये.