Arjun Tendulkar Ranji Trophy : रणजी ट्रॉफी 2022-23 (Ranji Trophy) मध्ये युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चांगल्या लयीमध्ये दिसून आला. काही सामन्यांमध्ये मात्र त्याला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र तरीही 23 वर्षीय खेळाडूच्या गोलंदाजीसमोर अनेक फलंदाजांनी गुडघे टेकले. डेब्यूच्या सामन्यात सेंच्युरी झळकावत अर्जुन तेंडुलकरने आपलं नाणं खणखणीत बजावलं होतं.
यामध्ये काहीच दुमत नाही की, अर्जुनने त्याच्या फलंदाजीने अनेकांना प्रभावित केलं. यासोबतच गोलंदाजीने देखील त्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्णाण केली आहे. आज या आर्टिकलच्या माध्यमातून आपण अर्जुन तेंडुलकरच्या आतापर्यंतच्या प्रदर्शनावर नजर टाकणार आहोत.
रणजी ट्रॉफीमध्ये 2022-23 मध्ये अर्जुन तेंडुलकर गोव्याच्या टीमकडून खेळताना दिसला. गोव्याकडून खेळताना त्याने चांगलं प्रदर्शन केलं. देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये खेळताना या युवा ऑलराऊंडरने आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये किफायतशीर गोलंदाजी केली आहे. या सामन्यांमध्ये अर्जुनने 12 खेळाडूंना माघारी धाडलं आहे.
7 सामन्यांमध्ये अर्जुन 3 वेळा 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर विरोधी टीमच्या गोलंदाजांना फलंदाजी करणं कठीण काम असायचं. याचमुळे डेब्यू सामन्यात त्याने 105 रन्सपेक्षाही कमी रन्स खर्च केले.
रणजी ट्रॉफीमध्ये 2022-23 मध्ये अर्जुन तेंडुलकर विरोधकांच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. अर्जुनने त्याच्या डेब्यू सामन्यामध्ये 104 रन्स देऊन 3 विकेट्स पटकावले होते. या उत्तम खेळीच्या जोरावर इतर सामन्यांसाठी गोव्याच्या टीममध्ये त्याने त्याची जागा निश्चित केली. अर्जुनच्या या कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये लवकरच त्यांची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जातंय. टीम इंडियाला अर्जुन सारख्या ऑलराऊंडरची गरज आहे.
गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.
अर्जुन तेंडुलकरने यॉर्कर बॉल टाकत झारखंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. या सामन्यामध्ये अर्जुनच्या गोलंदाजीवर खेळणं फलंदाजांना सोप्पं गेलं नाही. तर अर्जुनने एका यॉर्कर बॉलवर शाहबाज नदीमला थेट क्लिन बोल्ड केलंय. हा यॉर्कर बॉलला नदीमला खेळताच आला नाही.
शाहबाज नदीम फलंदाजी करत असताना अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. यावेळी अर्जुनने एक यॉर्कर फेकला, जो बॉल नदीमला समजलाच नाही आणि तो विकेट गमावून बसला. विकेट मिळाल्यानंतर अर्जुनने सेलिब्रेशन देखील केलं. अर्जुनने 26 ओव्हरमध्ये 3.46 च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत एक विकेट घेतली.