कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला? गोलंदाजांना झोडपत ठोकले 634 रन्स

कर्णधार म्हणून रहाणेची स्टाईल आणि निर्णय घेण्याची क्षमता फारच चांगली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होतोय. 

Updated: Jan 29, 2023, 03:24 PM IST
कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला? गोलंदाजांना झोडपत ठोकले 634 रन्स title=

Ajinkya Rahane : भारतीय क्रिकेट टीमचा अनुभवी फलंदाज (Ajinkya Rahane) गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये होता. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याला टेस्ट टीम इंडियामधूनही (Test Team India) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सध्या भारतात देशांतर्गत रणजी ट्रॉफीची (Ranji Trophy) स्पर्धा खेळवण्यात येतेय. या स्पर्धेत मुंबईच्या टीमचं (Mumbai Ranji Team) प्रदर्शन चांगलं होतंय. केवळ टीम नाही तर टीमचा कर्णधार देखील स्पर्धेत चांगली कामगिरी करताना दिसतोय.

कर्णधार म्हणून रहाणेची स्टाईल आणि निर्णय घेण्याची क्षमता फारच चांगली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होतोय. मात्र बॉर्डर गावस्कर (Border–Gavaskar Trophy) ट्रॉफीसाठी पहिल्या दोन टेस्ट सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेला टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र सध्याचा त्याचा खेळ पाहता उर्वरित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी बीसीसीआय (BCCI) त्याला टीममध्ये संधी देण्याचा विचार करू शकते. 

Ajinkya Rahane ने ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे

भारतीय टीमचा वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) त्याचा शांत स्वभाव आणि आक्रामक फलंदाजीसाठी ओळखला जातो. विदेशी मैदानांवर देखील त्याचा खेळ उत्तम असल्याचं दिसून आलं आहे. SENA (South Africa, England, New Zealand, Australia) देशांमध्ये अनेकदा त्यांनी कठीण परिस्थितीत टीमसाठी मोलाचं सहकार्य दिलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा रहाणेची (Ajinkya Rahane) बॅट थैमान घालताना दिसतेय.

रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेची बॅट तळपली

देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीध्ये अजिंक्य रहाणेचा खेळ चांगला सुरु आहे. त्याने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टेस्ट सामन्यासाठी बीसीसीआय अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबईकडून खेळताना आणि टीमचं नेतृत्व सांभाळताना अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) जवळपास प्रत्येक सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अजिंक्यने 204 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर देखील त्याच्या बॅटमधून रन्सचा पाऊस पहायला मिळाला.

आतापर्यंत 6 सामन्यामध्ये त्याने 11 डावांमध्ये उत्तम सरासरीने 634 रन्स केले आहे. यामध्ये एक द्विशतक आणि एका 191 रन्सच्या खेळाची समावेश आहे. आसामच्या टीमविरूद्ध त्याने हा उत्तम खेळ केला होता. शिवाय दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ही त्याने अर्धशतक झळकावलं होतं.