Arjun Tendulkar : टीम इंडियामध्ये अर्जुन तेंडुलकरची एन्ट्री? गिलच्या नेतृत्वाखाली 'या' दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

Arjun Tendulkar : टीम इंडियाला आयरलँड विरूद्ध सिरीज खेळायची आहे. या सिरीजसाठी टीम इंडियाचं कर्णधारपद नवखा खेळाडू शुभमन गिलला दिलं जाऊ शकतं. यावेळी टीममध्ये अर्जुन तेंडुलकरच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

Updated: Jun 6, 2023, 08:37 PM IST
Arjun Tendulkar : टीम इंडियामध्ये अर्जुन तेंडुलकरची एन्ट्री? गिलच्या नेतृत्वाखाली 'या' दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता title=

Arjun Tendulkar : टीम इंडिया ( Team India ) सध्या इंग्लंडमध्ये असून बुधवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ( ICC World Test Championship ) फायनल सुरु होणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. यानंतर टीम इंडियाला आयरलँड विरूद्ध सिरीज खेळायची आहे. दरम्यान या सिरीजसाठी टीम इंडियाचं कर्णधारपद नवखा खेळाडू शुभमन गिलला ( Shubman Gill ) मिळू शकतं. इतकंच नाही तर या सिरीजसाठी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. 

ऑगस्ट महिन्यामध्ये टीम इंडिया ( Team India ) आयरलँडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी टीम इंडियाला 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. या दौऱ्यासाठी संभाव्या 15 सदस्यांच्या टीम कशी असेल याच्यावर नजर टाकूया. 

शुभमन गिलकडे ( Shubman Gill ) सोपवणार कर्णधारपद?

आयलँडविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये नवख्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे एशिया कप आणि वर्ल्डकप तोंडावर आहे. अशा परिस्थितीत काही सिनियर खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. यावेळी टीम इंडियाचा सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेला नवखा खेळाडू शुभमन गिलकडे ( Shubman Gill ) कर्णधारपद दिलं जाऊ शकतं. 

अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याची शक्यता

आयरलँडविरूद्धच्या सिरीजसाठी टीम इंडियात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यामध्ये अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) आणि विरेंद्र सेहवागचा पुतण्या मयंक डागर यांचाही समावेश केला जाऊ शकतो. अर्जुन आणि मयंक यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. परिणामी मयंक आणि अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) या दोघांना आयर्लंडविरुद्धच्या टीममध्ये संधी मिळू शकते, अशी अटकळ बांधली जातेय. दरम्यान बीसीसीआयकडून ( BCCI ) याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.

आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची बी टीम पूर्णपणे तयार होऊ शकते. अर्जुनसोबत आयपीएलमध्ये तुफान कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगलाही टीममध्ये स्थान मिळू शकतं. एकंदरीत या सिरीजमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयलँडविरूद्ध कशी असेल संभाव्य टीम इंडिया

टीम इंडिया : शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, प्रभसिमरन सिंह, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, मयंक डागर, अक्षर पटेल (उपकर्णधार), मोहित शर्मा, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), यश ठाकुर, हरप्रीत बराड़, आकाश मधवाल आणि अर्शदीप सिंह