Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar ) मुलगा अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) डेब्यू केल्यानंतर त्याच्या नावाची चर्चा रंगली. आयपीएलमध्ये अर्जुनला अधिक संधी मिळाली नाही. अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) केवळ 4 सामने खेळले. मात्र आता अर्जुनचे टीम इंडियामध्ये डेब्यू करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी त्याची तयारीही सुरु झाल्याचं दिसून येतंय. यावेळी अर्जुनचा ( Arjun Tendulkar ) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो तुफान वेगाने गोलंदाजी करतोय.
टीम इंडियामध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जुन तेंडुलकरचे ( Arjun Tendulkar ) प्रयत्न सध्या सुरु असल्याचं दिसतंय. अर्जुनने ( Arjun Tendulkar ) नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो स्टोरीवर शेअर केलाय. ज्यामध्ये अर्जुन ( Arjun Tendulkar ) प्रॅक्टिस करताना दिसतोय. याचसोबत दुसरीकडे अर्जुनचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो उत्तम गोलंदाजी करताना दिसतोय.
जवळपास 3 वर्षांच्या कालावधीनंतर अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. याशिवाय नुकतंच त्याने रणजीमझ्ये गोव्याकडूनही डेब्यू केलंय. यानंतर आता अर्जुन ( Arjun Tendulkar ) टीम इंडियामध्ये डेब्यू करणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
आयपीएलमध्ये अर्जुनने ( Arjun Tendulkar ) एक सामना सोडला तर गोलंदाजी चांगली केली असं म्हणायला हरकत नाही. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची तुलना बेन स्टोक्ससोबत केली जाते. अशातच अर्जुनच्या ( Arjun Tendulkar ) गोलंदाजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, यामध्ये अर्जुन तुफान फलंदाजी करतोय. अर्जुन जवळपास 145 च्या वेगाने गोलंदाजी करताना दिसतोय. त्याच्या या गोलंदाजीमुळे समोर असलेल्या फलंदाजांच्या दांड्या गुल झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान हा व्हिडीओ कधीचा आहे, याची पुष्टी केलेली नाही.
अर्जुनच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर अर्जुन ( Arjun Tendulkar ) आता टीम इंडियामध्ये डेब्यू करणार अशी चर्चा रंगली आहे. शिवाय वेस्ट इंडिजनंतर होणाऱ्या आयर्लंडविरूद्धच्या दौऱ्यावर अर्जुनचं ( Arjun Tendulkar ) टीम इंडियामध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता आहे, असं म्हटलं जातंय.
2022 मध्ये अर्जुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यावेळी त्याने 7 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 12 विकेट घेतल्यात. याशिवाय त्याने उत्तम फलंदाजीही केली. फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून 223 धावा निघाल्या. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.
दुसरीकडे आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यावेळी त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच एका सामन्यात फलंदाजी करत अर्जुनने 9 बॉल्समध्ये 13 रन्स केलेत.