Arjun Tendulkar: देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने सुरु झाले आहेत. 17 जानेवारीपासून या टूर्नामेंटमध्ये गोवा विरूद्ध सर्विसेज (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झाला आहे. सर्विसेजचा कर्णधार रजत पालीवाल याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) मोलाची भूमिका बजावली.
अर्जुनने त्याच्या गोलंदाजीने सर्विसेजच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. मात्र केवळ गोलंदाजीच नाही तर अर्जुनने फलंदाजीमध्ये देखील स्वतःला पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे. ज्यामुळे त्याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळताना सर्विसेजविरूद्ध उत्तम गोलंदाजी केली. पहिल्या डावात अर्जुनने 13 ओव्हरमध्ये सर्वात कमी 2.08 च्या इकोनॉमीने रन दिले. ज्यामध्ये त्याला 2 विकेट्स देखील पटकावले. याशिवाय लक्ष्य गर्ग आणि सुयश प्रभुदेसाई यांनाही 1-1 विकेट मिळवण्यात यश आलं आहे. मात्र त्यांची इकोनॉमी 3 पेक्षा जास्त होती. सर्विसेस टीमच्या रवी चौहान आणि कर्णधार रजत पालिवाल यांची विकेट मिळाली.
मात्र अर्जुन इतक्यावरच थांबला नाही. तर आठव्या नंबरवर फलंदाजी करायला उतरल्यानंतर त्याने 27 रन्सची खेळी केली. यामध्ये 2 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. त्याच्या या खेळीने आगामी काळात अर्जुन ऑलराऊंडर म्हणून मैदानात उतरू शकतो.
जर अर्जुनची कामगिरी अशीच राहिली तर त्याला आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेली मुंबई इंडियन्स या टीमकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून अर्जुन या टीमसोबत आहे. मात्र आतापर्यंत त्याला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाहीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जर अर्जुनचा फॉर्म असाच राहिला तर त्याला मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये संधी मिळणू शकते.
गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.
गेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने यॉर्कर बॉल टाकत झारखंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. या सामन्यामध्ये अर्जुनच्या गोलंदाजीवर खेळणं फलंदाजांना सोप्पं गेलं नाही. तर अर्जुनने एका यॉर्कर बॉलवर शाहबाज नदीमला थेट क्लिन बोल्ड केलंय. हा यॉर्कर बॉलला नदीमला खेळताच आला नाही.
शाहबाज नदीम फलंदाजी करत असताना अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. यावेळी अर्जुनने एक यॉर्कर फेकला, जो बॉल नदीमला समजलाच नाही आणि तो विकेट गमावून बसला. विकेट मिळाल्यानंतर अर्जुनने सेलिब्रेशन देखील केलं. अर्जुनने 26 ओव्हरमध्ये 3.46 च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत एक विकेट घेतली.