Citizenship rules in UK : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. अनुष्काने इन्टाग्रामवर पोस्ट करत गुड न्यूड दिली. विरुष्काने वामिकाच्या भावाचं नाव अकाय ठेवलं आहे. अकायच्या (Akaay) जन्माची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. अकायचा जन्म लंडनमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता अकायला युकेचं नागरिकत्व मिळणार का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता संविधानातील नियम (Citizenship rules in UK) काय सांगतो? याची माहिती घेऊया
साधारणत: कोणतीही जो व्यक्ती ज्या देशाचा जन्मला आहे, तो त्या देशाचा नागरिक असतो, परंतु यासाठी त्याचे आई आणि वडील दोघंही एकाच देशाचं नागरिक असणं आवश्यक असतं. तर काही देशांमध्ये आई किंवा वडील दोघांपैकी कोणीही एकजण असेल तरीही नागरिकत्व मिळतं. वेगवेगळ्या देशात वेगवेगळे नियम असतात. मात्र, तरीही अकायला युकेचं नागरिकत्व मिळणार नाही. त्याचं कारण नेमकं काय आहे?
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने वैद्यकीय साधनांच्या उपलब्धतेमुळे मुलाच्या जन्मासाठी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत युकेचं नागरिकत्व मिळत नाही. त्यामुळे आता अकायला नागरिकत्व मिळत नाही. जर त्याला नागरिकत्व पाहिजे असेल तर काही नियम आणि अटी पाळाव्या लागतील.
काय आहेत युकेचं नागरिकत्व मिळवण्याचे नियम?
युकेचं नागरिकत्व मिळण्याचे नियम आधीच्या काळी खूर किचकट होते. मात्र, आता त्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. सलग 5 वर्षे वैध व्हिसावर यूकेमध्ये राहिल्यानंतर कोणतीही व्यक्ती तिथल्या नागरिकत्वासाठी अर्ज करू शकत होती. त्यानंतर लोकांना इंग्रजी आणि जनरल नॉलेजची एक परिक्षा द्यावी लागते. त्यानंतर लोकांना तात्पुरतं नागरिकत्व दिलं जातं. त्यानंतर कायमस्वरुपी नागरिकत्व मिळवण्यासाठी पॉइंट सिस्टममधून जावं लागलं. तुमची शिस्त आणि वागणूक पाहून तुम्हाला पॉइंट्स दिले जातात. त्यानंतर तुम्हाला कायमस्वरुपी नागरिक्तव मिळतं.