अनुष्काचे वडील जावई विराटला देणार हे खास गिफ्ट

लग्नानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 9, 2018, 09:39 AM IST
अनुष्काचे वडील जावई विराटला देणार हे खास गिफ्ट title=

मुंबई : लग्नानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत.

आपल्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला मात्र दोघेही सोबत नसणारेत. अनुष्का परी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईमध्ये असणार आहे. विराट भारत-दक्षिण आफ्रिका सिरीजसाठी विराट सेंच्यूरियनमध्ये आहे. दोघेही एकत्र नसले तरी त्यांना एक छान गिफ्ट मिळणार आहे.

सासरे देणार गिफ्ट

अनुष्काचे वडील कर्नल अजय शर्मा आपली मुलगी आणि जावई यांना स्पेशल गिफ्ट देणार आहे. काही दिवसांपूर्वी ते बांद्रा येथे एका बुक लाँच दरम्यान दिसले होते. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अनुष्काचे आई-वडील त्यांच्या एका मित्राच्या मुलीच्या पुस्तकाच्या लाँचिंगसाठी हजर होते. लेखिका तेजस्वनी दिव्या नाईकच्या पुस्तक लाँचिंगसाठी दोघांनी हजेरी लावली. हे पुस्तक प्रेम कवितांवर आधारीत आहे. अनुष्काच्या वडिलांना हे कवितांचा पुस्तक इतकं आवडलं की त्यांनी याची एक कॉपी घेतली आणि ते अनुष्का आणि विराटला गिफ्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कवितांचा छंद 

विराट कोहलीला कवितांचा छंद आहे. आपल्या लग्नात देखील त्याने पाहुण्यांना सूफी संत रूमीच्या कवितांचा संग्रह रिटर्न गिफ्ट म्हणून दिला होता. 11 डिसेंबरला इटलीमध्ये दोघांनी विवाह केला होता. त्यांनतर दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांनी रिशेप्शन दिलं होतं.