...तर विराटची बायको नाही, वहिनी झाली असती अनुष्का शर्मा

विराटच्या आधी या खेळाडूसोबत जुळलं अनुष्काचं नाव

Updated: Apr 24, 2018, 02:37 PM IST
...तर विराटची बायको नाही, वहिनी झाली असती अनुष्का शर्मा title=

मुंबई : भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूड कलाकारांचं कनेक्शन जवळचं आहे. अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्री क्रिकेट खेळाडूंवर फिदा आहेत. अनेक अभिनेत्री याआधी देखील खेळाडूंसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह झाला. पण अनुष्काचं पहिलं प्रेम हा दुसरा खेळाडू होता. असं बोललं जात होतं.

कोणासोबत जुळलं नाव?

अनुष्काचं नाव आधी क्रिकेटर सुरेश रैनासोबत जुळलं होतं. यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. एका इंग्रजी वेबसाईच्या बातमीनुसार दोघांच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं होतं की, यांच्यात जवळीकता वाढत आहे. सुरेश रैनाला अनुष्कासोबत अनेक पार्टीमध्ये देखील पाहिलं गेलं होतं. दोघांच्या चर्चा सोशल मीडियावर पोहोचल्यानंतर अनुष्का शर्माने कधीच ही गोष्ट मान्य केली नाही. एका किसमुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता असं देखील बोललं जातं. 

सुरेश रैनाने 2015 मध्ये विवाह केला. त्याला एक मुलगी देखील आहे. सुरेश रैना आणि अनुष्का शर्मामध्ये जर सगळं काही व्यवस्थित असतं तर आज अनुष्का विराटची वहिनी बनली होती.