मुंबई : विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सीरिजमध्ये बिझी आहे. त्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्माला तो वेळ देऊ शकत नाहीये.
विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरोधात सुरु असलेल्या सीरिजमुळे खूपच बिझी आहे. तर तिकडे अभिनेत्री अनुष्का शर्माही आपल्या सिनेमांत बिझी आहे. त्याच दरम्यान अनुष्का शर्मा जीक्यू मॅन ऑफ द ईयर अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात दाखल झाली. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमात सर्वात आकर्षणाचं केंद्र राहीलं ते म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा. या कार्यक्रमात दोघेही जवळपास मॅचिंग कपडे परिधान करुन आल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमात दोघंही रेड कारपेटवर एकत्र आले आणि एकमेकांना हग केलं. या दोघांची भेट तेथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. या भेटीचे फोटोज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
Omg! @RanveerOfficial and @anushkasharma at the #GQAwards ~ sizzle level just sky-rocketed ⚡️@gqindia pic.twitter.com/ZSnnKOyvmR
— YRF Talent (@yrftalent) September 22, 2017
सूत्रांच्या मते, 'बँड बाजा बारात' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. मात्र, काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर रणवीर-दीपिका आणि अनुष्का शर्मा- विराट कोहली एकमेकांजवळ आल्याचं पहायला मिळालं.
शुक्रवारी रात्री मुंबईतील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये जीक्यू मेन ऑफ द ईयर अवॉर्ड्समध्ये रणवीर दाखल झाला. त्यावेळी त्याची भेट अनुष्कासोबत झाली. मग दोघांनी गळाभेट घेत एकमेकांचं स्वागत केलं.