विराटच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला सुंदर फोटो

लग्नानंतर विराटचा पहिला वाढदिवस...

Updated: Nov 5, 2018, 05:39 PM IST
विराटच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला सुंदर फोटो title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. विराट कोहली आज 30 वर्षाचा झाला आहे. अनेक दिग्गज व्यक्तींनी त्य़ाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'रनमशीन' विराट कोहलीचा जन्‍म 5 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये झाला होता. आज क्रिकेट जगतात तो सर्वात श्रेष्ठ फंलदाज म्हणून ओळखला जातो. सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहलीच मोडू शकतो अशी देखील चर्चा आहे.

कोहलीच्या वाढदिवशी पत्नी अनुष्का शर्माने त्याला वेगळ्या अंदाजात विश केलं. अनुष्काने विराटसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने म्हटलं की, 'देवा यांना जन्म दिल्यामुळे धन्यवाद...'. फोटोमध्ये अनुष्का विराटला हग करताना दिसत आहे. हा फोटो नेमका कुठला आहे हे अजून समोर आलेलं नाही.

लग्नानंतरचा विराटचा हा पहिला वाढदिवस आहे. त्य़ामुळे विराट आणि अनुष्का वाढदिवस साजरा करण्यासाठी नरेंद्रनगर येथे गेले आहेत. कोहली आणि अनुष्का वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्काचे आध्यात्मिक गुरुंच्या आश्रमात देखील जाणार आहेत. अनुष्का आध्यात्मिक गुरु अनंत बाबा पाटील यांना खूप मानते. लग्नानंतर देखील दोघेही हरिद्वार येथील अनंत बाबा पाटील आश्रमात आले होते.