दिल्ली : भारतीय महिला वनडे क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिने नवा इतिहास रचला आहे. मिताली राज सर्व फॉरमॅटमध्ये 20,000 धावा पूर्ण करणारी पहिली महिला फलंदाज बनली आहे. मितालीने फर्स्ट क्लास, लिस्ट-ए, टी -20 आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तीनही फॉरमॅटमध्ये धावा करून हा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.
21 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्या दरम्यान मिताली राजने हा टप्पा गाठला. मिताली राजने या सामन्यामध्ये 107 बॉल्समध्ये 61 रन्सची खेळी केली.
मिताली राजचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द पाहिली तर तिने 217 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7304 रन्स केले आहेत. तर 11 टेस्ट मॅचेसमध्ये तिने 669 रन्स केले आहेत. याशिवाय टी-20 सामन्यांतील तिची कामगिरी पाहिली तर तिने 89 सामन्यांत 2364 रन्स केले आहेत.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा नऊ विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने आठ विकेट्स गमावत 225 धावा केल्या. कर्णधार मिताली राजने भारताकडून सर्वाधिक 61 धावा केल्या. मंगळवारी, भारतीय महिलांनी लवकर विकेट गमावल्यानंतर, भारतीय कर्णधाराने 63 धावांची भागीदारी केली आणि यास्तिका भाटिया (35) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 77 रन्स केले.