क्रिकेटमध्ये नवा विक्रम, केवळ ८२ चेंडूत २७९ धावा

आज येथे खेळलेल्या एका स्पर्धेत आंध्र प्रदेशच्या एका फलंदाजाने ८२ चेंडूत २७९ धावा कुटल्यात. त्याने आपल्या नावावर नवा विक्रम नोंदविलाय. व्यंकटेश राव असे या खेळाडूचे नाव आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 31, 2017, 08:06 PM IST
क्रिकेटमध्ये नवा विक्रम, केवळ ८२ चेंडूत २७९ धावा title=

मुंबई : आज येथे खेळलेल्या एका स्पर्धेत आंध्र प्रदेशच्या एका फलंदाजाने ८२ चेंडूत २७९ धावा कुटल्यात. त्याने आपल्या नावावर नवा विक्रम नोंदविलाय. व्यंकटेश राव असे या खेळाडूचे नाव आहे.

या स्फोटक खेळीत व्यंकटेशने ४० चौकार आणि १८ उत्तुंग षटकार खेचले. त्याचवेळी आंध्र प्रदेशने यजमान मुंबईला २९२ धावांनी पराभूत केले.  

टी -२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नॅशनल ब्लाइंड टूर्नामेंटमध्ये ३८० धावांचा डोंगर उभा करताना व्यंकटेशने ८२ चेंडूत २७९ धावा केल्या. व्यंकटेशसह त्याचा सहकारी टी. कृष्णाने ४१ चेंडूत ७५ धावा कुटल्यात.