'विराटनं भडकून मला शिव्या दिल्या'

आयपीएलचे पहिले ८ मोसम मुंबईकडून खेळल्यानंतर अंबाती रायडू या मोसमात धोनीच्या चेन्नईकडून खेळला. रायडूला चेन्नईनं २.२० कोटी रुपयांना विकत घेतलं.

Updated: May 31, 2018, 04:59 PM IST
'विराटनं भडकून मला शिव्या दिल्या' title=

मुंबई : आयपीएलचे पहिले ८ मोसम मुंबईकडून खेळल्यानंतर अंबाती रायडू या मोसमात धोनीच्या चेन्नईकडून खेळला. रायडूला चेन्नईनं २.२० कोटी रुपयांना विकत घेतलं. चेन्नईकडून खेळताना जबरदस्त फॉर्म दाखवल्यामुळे त्याच भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय टीममध्ये रायडूची निवड करण्यात आली आहे.  अंबाती रायडूनं हरभजन सिंगचा शो 'Quick Heal Bhajji Blast show'मध्ये त्याचा क्रिकेट कारकिर्दीतल्या लकी चार्मबद्दल सांगितलं. विराट कोहलीची बॅट माझ्यासाठी लकी असल्याचं रायडू म्हणाला. विराट कोहलीकडून मी प्रत्येक वर्षी नवीन बॅट घेतो. यावर्षी तर विराट माझ्यावर भडकला, त्यानं मला शिव्याही दिल्या, असं वक्तव्य रायडूनं केलं आहे.

विराटच्या बॅटमुळे शानदार प्रदर्शन

विराट कोहलीनं दिलेल्या बॅटमुळे यावर्षी आयपीएलमध्ये मी शानदार प्रदर्शन केलं, असं रायडूला वाटतंय. आयपीएल २०१८मध्ये रायडू चेन्नईचा सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू होता. रायडूनं या आयपीएलच्या १६ मॅचमध्ये ४३ च्या सरासरीनं ६०२ रन केले. यामध्ये १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये ५३ सिक्स आणि ३४ फोरचा समावेश होता. 

२०१० ते २०१७ मध्ये रायडू मुंबईकडून खेळला होता. या ८ मोसमात रायडूनं २,४१६ रन केले होते. यामध्ये रायडूला एकदाही ४०० पेक्षा जास्त रन बनवता आले नाहीत. पण यंदा मात्र त्यानं ६०० रनचा टप्पा ओलांडला.