भारताविरुद्ध पराभवानंतर जयसूर्यासह श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांचा राजीनामा

टेस्ट आणि वनडे सिरीजमध्ये भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यामध्ये निवड समिती अध्यक्ष सनथ जयसुर्यासह रंजीत मदुरासिंघे, रोमेश कालूवितर्णा, असंका गुरुसिंघा आणि एरिक उपाशांता यांचाही समावेश आहे.

Updated: Aug 30, 2017, 09:55 AM IST
भारताविरुद्ध पराभवानंतर जयसूर्यासह श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांचा राजीनामा title=

कोलंबो : टेस्ट आणि वनडे सिरीजमध्ये भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यामध्ये निवड समिती अध्यक्ष सनथ जयसुर्यासह रंजीत मदुरासिंघे, रोमेश कालूवितर्णा, असंका गुरुसिंघा आणि एरिक उपाशांता यांचाही समावेश आहे.

श्रीलंका क्रीडा बोर्डाच्या आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, निवड समितीच्या सदस्यांनी दिलेले राजीनामा अजून स्विकारण्यात आलेले नाहीत. जोपर्यंत राजीनामा स्विकारला जाणार नाही तोपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहतील. राजीनामा स्विकारला तरीही सहा सप्टेंबर पर्यंत त्यांना आपल्या पदावर कायम राहवे लागणार आहे. सहा सप्टेंबर रोजी भारत दौऱ्याचा शेवट होणार आहे. पाच वनडे मॅचची सिरीज भारताने 3-0 ने खिशात घातली आहे.