काश मी पहिल्याप्रमाणे....; टीम इंडियातून सतत बाहेर असलेल्या Ajinkya Rahane ने व्यक्त केली खदखद

सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) 5 सामन्यांमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये 76 च्या सरासरीने 532 रन्स केले आहेत. ज्यामध्ये 204 हा त्याचा सर्वोत्तम स्कोर ठरला आहे. 

Updated: Jan 17, 2023, 02:51 PM IST
काश मी पहिल्याप्रमाणे....; टीम इंडियातून सतत बाहेर असलेल्या Ajinkya Rahane ने व्यक्त केली खदखद title=

Ajinkya Rahane: टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) सध्या भारताच्या टेस्ट टीममध्ये (Team India Test Team) देखील जागा मिळत नसल्याचं दिसतंय. तरूण वयामध्ये असलेल्या फलंदाजाप्रमाणे बनण्याचा तो आता पुन्हा प्रयत्न करत असल्याचं त्याने म्हटलंय. सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) 5 सामन्यांमध्ये त्याने 76 च्या सरासरीने 532 रन्स केले आहेत. ज्यामध्ये 204 हा त्याचा सर्वोत्तम स्कोर ठरला आहे. 

दिल्ली विरूद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यापूर्वी पीटीआयशी बोलताना अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) म्हणाला, मी जुन्या काळाबद्दल विचार करत होतो. ज्यावेळी मी पहिल्यांदा रणजी (2007) टीममध्ये आलो होतो. मी कसा खेळत होतो, मी कसा विचारांची प्रक्रिया कशी होती. मी आता वेगळ्या योजना आखल्या असून मी 'तो' अजिंक्य बनण्याचा प्रयत्न करतोय, जसा मी पूर्वीच्या दिवसांमध्ये होतो.

काही बदल केले आहेत

रहाणेने पुढे सांगितलं की, मी फक्त काही गोष्टी सरळ करू इच्छितो. गेल्या वर्षी सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर अजिंक्य रहाणे टीम इंडियातून बाहेर आहे. दरम्यान त्याने आता, त्याच्या खेळाच्या टेकनीकमध्ये बदल केले असल्याचं सांगितलं आहे. 

रहाणेच्या म्हणण्याप्रमाणे,  मी काहीसे बदल केले आहे. तुम्हाला एक खेळाडूच्या रूपात सतत विकास करावा लागतो. शिवाय तुमच्या रणनीतींवर तुम्हाला काम करावं लागेल आणि सुधारणा करत राहावं लागणार आहे. आता मला मुंबईच्या क्रिकेटविषयी विचार करावा लागेल आणि त्यासाठी चांगलं काम करावं लागेल. सध्या माझ्या डोक्यात हेच विचार सुरु आहेत.

ज्यावेळी तुम्ही चांगला खेळ करत असाल तेव्हा संपूर्ण जग तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करेल. यावेळी लोकं तुमच्याबद्दल चांगलं बोलतील पण सत्य परिस्थिती ही आहे की, जेव्हा तुम्ही चांगला खेळ करत नसाल तेव्हा तुम्हाला हे पाहावं लागणार आहे की, किती लोक तुमच्या सोबत आहेत. माझ्यासाठी ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असल्याचं, रहाणेने म्हटलं आहे.

अजिंक्य रहाणेने भारताकडून 82 टेस्ट, 90 वनडे आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत. रहाणेच्या म्हणण्यानुसार, मी सध्या माझ्या फलंदाजीबाबत जास्त विचार करत नाहीये. मात्र माझ्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. 

रहाणेचा सरफराजला खास सल्ला

सरफराजला काय सल्ला देशील यावर रहाणेने उत्तर दिलंय की, माझा त्याला एक सोपा सल्ला आहे. ज्या गोष्टींना नियंत्रिण केलं जाऊ शकतं, त्या त्याने नियंत्रित कराव्यात. तसंच ज्या गोष्टी हातात नाहीत, त्यांचा जास्त विचार करू नये. फक्त एक गोष्ट करावी लागेल की, सध्याचा क्षण महत्त्वाचा आहे, जास्त पुढचा विचार करू नका.