दादा थँक्यू ! शेतात जाऊन अजिंक्य रहाणेने मानले शेतकऱ्याचे आभार

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने शेतकऱ्यांबद्दल असलेली त्याची कृतज्ञता दाखवली आहे.

Updated: Mar 13, 2019, 08:46 AM IST
दादा थँक्यू ! शेतात जाऊन अजिंक्य रहाणेने मानले शेतकऱ्याचे आभार title=

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने शेतकऱ्यांबद्दल असलेली त्याची कृतज्ञता दाखवली आहे. एका शेतामध्ये जाऊन अजिंक्य रहाणेने शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. याबद्दलचा एक व्हिडिओ अजिंक्य रहाणेने ट्विट केला आहे. 'एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. जर आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत', असं ट्विट रहाणेने केले आहे. 

या ट्विटसोबतच अजिंक्य रहाणेने शेतकऱ्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजिंक्य रहाणे म्हणतो, 'आज आपल्याला ज्या फळ-भाज्या मिळत आहेत, त्या शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे. त्यांचं जे काही आपल्या आयुष्यात योगदान आहे, ते फार महत्त्वाचं आहे. शेतकरी शेतात मेहनत करतो म्हणून आपल्याला खायला मिळतं. यामुळे मी शेतकरी दादांना थँक्यू म्हणू इच्छितो, त्यांचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे आणि खूप मोठं आहे. घरी कधीही जेवायला बसाल तेव्हा यामागे शेतकऱ्याची मेहनत आहे, हे विसरू नका.'