मुंबई : टीम इंडियानंतर आता आयपीएलमध्येही अजिंक्य रहाणेची कामगिरी खराब राहिली आहे. कोलकात्यासाठी ओपनर म्हणून उतरणारा रहाणे आयपीएलमध्येही फेल झाला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला साजेशी कामगिरी करता न आल्याने आजच्या सामन्यातून त्याला वगळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान यावर आता माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएलमध्येही रहाणेचा खराब फॉर्म कायम आहे. गेल्या पाच सामन्यांत त्याला आतापर्यंत केवळ 80 रन्स करता आले आहेत. त्यापैकी 44 धावा त्याने पहिल्याच सामन्यात केले होते.
संजय मांजरेकर यांच्या म्हणण्यानुसार, टीम अजिंक्य रहाणेला त्याच्या खराब फॉर्मनंतर ड्रॉप का करत नाही. मांजरेकर म्हणाले, रहाणेला फॉर्मच्या आधारावर वगळलं पाहिजे, कोणत्याही टीमने असंच केलं असतं.
संजय मांजरेकर पुढे म्हणाले, गेल्या वर्षीही तो दिल्ली कॅपिटल्समध्ये असताना चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याआधी राजस्थान रॉयल्ससाठी तो खेळत होता. अनेक वर्षांपासून तो फॉर्ममध्ये नाही पण कर्णधार आणि मॅनेजमेंटचा त्याच्यावर अजूनही विश्वास आहे.
यावेळी संजय मांजरेकर यांनी केकेआरच्या टीमसाठी पर्याय देखील सुचवले आहेत. ते म्हणाले, टीमसाठी आरोन फिंच बेंचवर बसला आहे. मात्र सॅम बिलिंग्सला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला ड्रॉप करणं योग्य नाही.