सगळे दिग्गज फेल; आता अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये समावेश होणार?

मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीवरंही प्रश्न उपस्थित केले जातायत. 

Updated: Apr 15, 2022, 10:43 AM IST
सगळे दिग्गज फेल; आता अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये समावेश होणार? title=

मुंबई : 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी 15 वा सिझन हा जणू एका वाईट स्वप्नाप्रमाणे आहे. यंदाच्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमला अजून एकंही विजय नोंदवता आलेला नाही. 5 सलग पराभवानंतर मुंबईच्या टीमवर टीका करण्यात येत आहेत. अशातच टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीवरंही प्रश्न उपस्थित केले जातायत. 

5 पराभवानंतर आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, लखनऊ सुपर जाएंट विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स टीममध्ये बदल करणार का? सध्याच्या परिस्थितीत टीममध्ये दिग्गज खेळाडू आहेत, मात्र हे दिग्गज खेळाडू फेल झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे तरूण खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यास हरकत नाही.

मेगा ऑक्शनमध्ये मिळाले 30 लाख रूपये

अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई टीमने 30 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. विशेष म्हणजे IPL 2021 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता कर्णधार रोहित शर्मा अर्जुनचा टीममध्ये समावेश करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

यापूर्वी मुंबईच्या फॅन्सने अर्जुनला मुंबईच इंडियन्सच्या टीममध्ये सामाविष्ट करण्याची मागणी केली होती. 

अर्जुन तेंडुलकर आता 22 वर्षांचा आहे. त्याने आत्तापर्यंत दोन T20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये अर्जुनने तीन रन्स करत दोन विकेट घेतल्या आहेत. अर्जुन तेंडुलकर हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.